‘वाहनचालक कुशल तर अपघात कमी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:20+5:302021-08-29T04:14:20+5:30
पुणे : वाहनचालक कुशल असेल तर अपघात कमी होतील. त्यामुळे प्रशिक्षणातून असे वाहनचालक तयार करणे हे जनहिताचेच काम आहे, ...
पुणे : वाहनचालक कुशल असेल तर अपघात कमी होतील. त्यामुळे प्रशिक्षणातून असे वाहनचालक तयार करणे हे जनहिताचेच काम आहे, असे प्रतिपादन माजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी केले.
सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग संचालक व त्यांचे प्रशिक्षक यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण वर्गातील सहभागींना झगडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) यांच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असते.
सीआय आरटीचे संचालक कॅप्टन राजेंद्र सनेर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष राजू घाटोळे व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. यापुढे सीआयआरटीच्या वतीने चालक प्रशिक्षण केंद्रांचे परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती कॅप्टन सनेर यांनी यावेळी दिली. प्रशांत काकडे यांनी प्रास्तविक केले.