वाहनचालकांनाे, ‘फास्टॅग’ची केवायसी करा अन्यथा ब्लॅकलिस्ट, एनएचएआयचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 12:00 IST2024-01-19T11:57:43+5:302024-01-19T12:00:02+5:30
एनएचएआयकडून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ याअंतर्गत याचे नियोजन केले आहे...

वाहनचालकांनाे, ‘फास्टॅग’ची केवायसी करा अन्यथा ब्लॅकलिस्ट, एनएचएआयचे आवाहन
पुणे : एनएचएआयकडून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ याअंतर्गत फास्टॅगद्वारे टोल वसुली सुलभरीत्या होण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या फास्टॅगची केवायसी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत करून घ्यावी अन्यथा फास्टॅग निष्क्रिय केले जातील किंवा ब्लॅकलिस्ट केले जातील, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
एनएचएआयकडून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ याअंतर्गत याचे नियोजन केले आहे. अनेक वाहनचालक एकच फास्टॅग अनेक वाहनचालकांना वापरत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने एक फास्टॅग एकाच वाहनाला वापरण्यात यावा, यासाठी शासनाने केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
एनएचएआय’ने निवेदनात म्हटले की, वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या फास्टॅगची कागदपत्र केवायसी झाली आहे की, नाही याची खातरजमा करावी. केवायसी केली नसेल तर ३१ जानेवारीच्या आत ती करून घ्यावी. अन्यथा ३१ जानेवारी २०२४ नंतर ज्या फास्टॅगची केवायसी केलेली नसेल तर तो फास्टॅग निष्क्रिय केला जाईल, अन्यथा ब्लॅक लिस्ट करण्यात येणार आहे. यामुळे वाहनमालकांनी केवायसी खातरजमा करावी, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.