Pune: दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा घरफोड्या, रिक्षाचालकच निघाला गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:33 AM2023-12-08T09:33:44+5:302023-12-08T09:34:16+5:30

सुमारे अडीचशे सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या पाहणीतून हा सराईत चोर अखेर चंदननगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला....

Driving a rickshaw during the day and burglarizing houses at night, the rickshaw driver turned out to be the criminal | Pune: दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा घरफोड्या, रिक्षाचालकच निघाला गुन्हेगार

Pune: दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा घरफोड्या, रिक्षाचालकच निघाला गुन्हेगार

पुणे : दिवसा रिक्षा चालवायचा आणि साथीदाराला प्रवासी म्हणून रिक्षात बसवायचा. रिक्षा भाडे घेण्याच्या बहाण्याने बंद घरांची पाहणी करून ते दोघे घरफोड्या करायचे. सुमारे अडीचशे सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या पाहणीतून हा सराईत चोर अखेर चंदननगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

अनिकेत भाऊराव गायकवाड (वय २१, रा. नवी सांगवी) असे अटक रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल सय्यद (रा. खराडी) यांनी फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, आरोपी अनिकेत गायकवाड हा मागील काही वर्षांपासून रिक्षा चालवितो. साथीदाराला प्रवासी म्हणून बसवून गायकवाड शहरात ठिकठिकाणी भाडे घेऊन गस्त घालत होता. भाड्याच्या निमित्ताने दिवसा पाहणी करून रात्री दोघे बंद घरे फोडत होते.

खराडी परिसरात राहणारे फिर्यादी १४ नोव्हेंबरला घर बंद करून मदुराईला गेले होते. आरोपींनी फिर्यादी यांचे घर फोडून लॅपटॉप, परदेशी चलन आणि नोटा असा एकूण सव्वादोन लाखांची घरफोडी केली होती. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुमारे अडीचशे सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पाेलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटक केली. त्याच्याकडून रिक्षा जप्त केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनीषा पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, प्रमोद हंबीर, पोलिस अंमलदार, दिलावर सय्यद, शिवा धांडे, विकास कदम यांच्या पथकाने केली.

Web Title: Driving a rickshaw during the day and burglarizing houses at night, the rickshaw driver turned out to be the criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.