धोकादायक वाळूवाहतुकीमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना इजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:29 AM2017-07-24T02:29:26+5:302017-07-24T02:29:26+5:30

इंदापूर तालुक्यातील बीकेबीएन रस्त्याने बेकायदेशीरपणे टिपर वाहनातून उघड्या पद्धतीने वाळुवाहतूक दिवस-रात्र बिनधास्त सुरू आहे.

Driving motorists' eyes due to dangerous sandwiches | धोकादायक वाळूवाहतुकीमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना इजा

धोकादायक वाळूवाहतुकीमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना इजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निरवांगी : इंदापूर तालुक्यातील बीकेबीएन रस्त्याने बेकायदेशीरपणे टिपर वाहनातून उघड्या पद्धतीने वाळुवाहतूक दिवस-रात्र बिनधास्त सुरू आहे. उघड्यावरील वाळुवाहतुकीमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत इंदापूर महसूल विभागकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल वाहनचालकांमधून केला जात आहे.
इंदापूर तालुक्यातून बीकेबीएन या रस्त्यावरून गेले अनेक महिने दिवसरात्र वाहतूक नियमांची पायमल्ली करून वाळुवाहतूक सुरू आहे. वाळू वाहनांवर कुठल्याही प्रकारची ताडपत्री वा कापड नसल्याने ही वाळू उडून इतर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जात आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांना इजा होत असून अपघातही वाढले आहेत. इंदापूर महसूल विभागाने ही वाहतूक बंद केली तर नीरा नदीतील वाळुचा उपसा मोठ्या प्रमाणात थांबेल. यामुळे निमसाखर व निरवांगीच्या मुख्य चौकात कायमस्वरूपी महसूल विभागाकडून अधिकारी नेमण्याची गरज आहे. यामुळे अवैध वाळुवाहतूक बंद होईल. यामुळे नीरा नदीच्या पात्रातील वाळूउपसाही बंद होईल.

नदीपात्राची होतेय चाळण
सध्या पाऊस नसल्याने शेतकरी संकटात आहे. वाळुउपशाचा थेट परिणाम नदीच्या पात्रातील पाण्यावर होत आहे. यामुळे त्वरित वाळुचा उपसा बंद होणे गरजेचे आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते केवळ वाळुवाहतुकीमुळे खराब होत आहेत. वाळुउपसा थांबल्यास हे चित्र दूर होईल.

Web Title: Driving motorists' eyes due to dangerous sandwiches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.