Pune Rain: सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच रिमझिम; पुणेकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत
By श्रीकिशन काळे | Published: July 23, 2023 05:26 PM2023-07-23T17:26:19+5:302023-07-23T17:26:54+5:30
पाऊस जरी कमी असला तरी पुण्यातील धरणे मात्र निम्मी भरली
पुणे : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पुणेकर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रविवारी देखील पावसाने सकाळी रिमझिम सुरू केली, परंतु, जोर काही धरला नाही. दुपारनंतर आकाश ढगाळ होते, पण जोरदार पावसाचे चिन्हे दिसली नाहीत. येत्या दोन दिवसांत पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रविवारी लोहगाव परिसरात चांगला पाऊस झाला. तिथे रविवारी ६ मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. त्यामुळे कोकणचा भाग व मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, घाट भागात भूस्खलन होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी कोकण व घाट भागात जाणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान, घाट माथ्यावर मात्र जोरदार पाऊस होत आहे. लोणावळामध्ये १२८ मिमी तर शिरगावला १७० मिमी पावसाची नोंद झाली. ताम्हिणी घाटात २३० मिमी पाऊस नोंदविला गेला आहे.
शहरातील पाऊस
शिवाजीनगर १.०० मिमी
लोहगाव ६.०० मिमी