कोरेगाव भीमातील संघर्षाचे पडसाद :घोषणांनी दुमदुमला डॉ. आंबेडकर पुतळा परिसर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:04 AM2018-01-04T03:04:38+5:302018-01-04T03:04:54+5:30

शहराच्या विविध भागांमधून येणारे कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे, हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत पुढे सरसावणारी पावले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... असे आंदोलनाचे स्वरूप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पाहायला मिळाले.

 Drops in the Coorga Bhima: Dr Dudu Ambedkar Statue Complex | कोरेगाव भीमातील संघर्षाचे पडसाद :घोषणांनी दुमदुमला डॉ. आंबेडकर पुतळा परिसर  

कोरेगाव भीमातील संघर्षाचे पडसाद :घोषणांनी दुमदुमला डॉ. आंबेडकर पुतळा परिसर  

Next

पुणे -  शहराच्या विविध भागांमधून येणारे कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे, हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत पुढे सरसावणारी पावले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... असे आंदोलनाचे स्वरूप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पाहायला मिळाले. दिवसभरात हजारो कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध केला. या आंदोलनामध्ये तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
शहराच्या विविध भागांमधून सकाळपासूनच मोर्चे निघण्यास सुरुवात झाली होती. हजारोंच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे काही मोर्चे येत होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केल्याचे दिसून आले. ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्याची एक मार्गिका आंदोलकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. तर, दुसºया मार्गिकेमध्ये पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. उद्यानामधील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापाशीही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या ठिकाणी येणाºया विविध गटांच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध करतानाच दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, ज्या गावांमध्ये दलितांवर हल्ला झाला, त्या गावांचे शासकीय अनुदान रद्द करण्याची मागणीही आंदोलकांनी या वेळी केली. भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा मुलगाही या आंदोलनात सहभागी झाला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबवेवाडीमधून पहिला मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये २ हजार नागरिक सहभागी झाले होते. बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुष्पमंगल चौक, स्वारगेट, शिवाजी रस्ता, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर हा मोर्चा संपला. तर, त्यानंतर पुणे स्टेशन परिसरामधून दुसरा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून नरपतगीर चौक, केईएम रुग्णालय, दारूवाला पूल, लाल महाल, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस चौक, शाहीर अमर शेख चौक, आरटीओ मार्गे जहांगीर रुग्णालयाजवळ संपला.
दांडेकर पुलावरूनही आंबेडकरी चळवळीतील हजारो कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने मोर्चा काढला होता. दांडेकर पुलावर या वेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चासोबतच पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि अन्य अधिकारी चालत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. त्यानंतर दुपारी पुणे पालिकेसमोरील नदीपात्रातूनही ४००-५०० कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. यासोबतच त्रोटक संख्येने येणारे कार्यकर्तेही जबरदस्त घोषणाबाजी करीत होते. शासनाविरुद्ध असलेला राग घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केला जात होता.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया (ए), भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन जनशक्ती, दलित पँथर आॅफ इंडिया, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन
सेना आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे डॉ. आंबेडकर पुतळ्याकडे येत होते. आजच्या आंदोलनात मुस्लिम संघटना सहभागी झाल्याचे दिसून आले.

४डॉ. आंबेडकर
पुतळ्याकडे दिवसभर कार्यकर्ते येतच होते. दुपारी एका कलापथकाने आंबेडकरी चळवळीची गाणी वाद्यांसकट सादर करून आंदोलनाची धार तीव्र करण्याचा प्रयत्न केला. ही गाणी ऐकल्याने कार्यकर्ते आणखीनच घोषणाबाजी करू लागले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी चारनंतर आंदोलकांची पुतळ्याकडे येणारी संख्या एकदम कमी झाली. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही हळूहळू कमी करण्यात आला. संध्याकाळी आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतर आंदोलकदेखील पांगले होते.

आंदोलक पुतळ्याच्या दिशेने येणार,हे निश्चित असल्याने पोलिसांनी या भागात येणारी वाहतूक बंद केली होती. जहांगीरजवळ मोर्चा आल्याने पुणे स्टेशन आरटीओ ते जहांगीर व जहांगीर ते आरटीओ जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला होता. तसेच, ससून रुग्णालयाकडे येणारे रस्ते खुले असले, तरी वाहतूक मात्र नव्हती.

कार्यकर्त्यांची गर्दी वाढलेली असतानाच वाहनांना रस्ता
बंद करण्यात आला होता. मात्र, रुग्णवाहिकांसाठी कार्यकर्त्यांनी वारंवार रस्ता मोकळा करून दिला.

मिलिंद एकबोटे व भिडेगुरुजींविरोधात आणखी एक तक्रार


पुणे : कोरेगाव भीमा येथील दगडफेकप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेगुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात बुधवारी येरवडा पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार अर्ज आला आहे.
हा प्रकार कोरेगाव भीमा येथील असल्याने आम्ही ही तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केली आहे़ याआधीच मंगळवारी त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी ही तक्रार दिली आहे. ही तक्रार आम्ही घेऊन शिक्रापूर पोलिसांकडे पुढील कारवाईसाठी पाठविली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी सांगितले.

दगडफेक करणाºयांवर गुन्हे : जमाव जमवून रॅली काढून मंगळवारी वाहने अडविणाºया आणि दगडफेक करणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ बंडगार्डन, लष्कर, पिंपरी, एमआयडीसी आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यांत जवळपास साडेपाचशे ते सहाशे जणांवर गुन्हे दाखल केले आहेत़ मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी जमलेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत
२२ पीएमपी बस, एसटी बस आणि खासगी वाहनांचे नुकसान झाले होते़

Web Title:  Drops in the Coorga Bhima: Dr Dudu Ambedkar Statue Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.