दुष्काळाच्या झळा वाढल्या; पाणी टंचाईमुळे ७५७ टँकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:23 PM2019-04-29T13:23:50+5:302019-04-29T13:32:32+5:30

यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पुण्यात शंभर वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

Drought has increased; 757 tankers started due to water scarcity | दुष्काळाच्या झळा वाढल्या; पाणी टंचाईमुळे ७५७ टँकर सुरू

दुष्काळाच्या झळा वाढल्या; पाणी टंचाईमुळे ७५७ टँकर सुरू

Next
ठळक मुद्देविभागात १३ लाख नागरिक ; पाऊणे दोन लाख पशुधन बाधित परिणामी पुणे विभागातील सोलापूर ,सांगली,सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यात

पुणे: सूर्याचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून बहुतेक ठिकाणी तापमानाची नोंद ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत होत आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहता अधिकच जाणवू लागली आहे. परिणामी पुणे विभागातील सोलापूर ,सांगली,सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यात ७५७ टँकर पाणी पुरवठा करावा लागत आहे. विभागात १३ लाख ४६ हजार ७८९ नागरिक आणि १ लाख ७२ हजार ७२८ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पुण्यात शंभर वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.त्यामुळे टँकरने पाणी पुरवठ्यात वाढ झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार विभागात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २२३ टँकरने पाणी पुरवठा केला जात असून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या १७९ टँकर पैकी एकट्या जत तालुक्यात १०३ टँकर चालू आहेत. साता-यात १९२ तर पुणे जिल्ह्यात १६३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या २५ दिवसांत सोलापूर जिल्ह्यात १५९ टँकर वाढले असून साता-यात ११३ तर सांगलीत ९१ आणि पुण्यात ८९ टँकर वाढले आहेत.त्यामुळे येत्या मे व जून महिन्यात टँकरची संख्या दीड ते दोन हजारावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात १९८ गावांतील आणि १ हजार ३०५ वाड्यांमधील ४ लाख १२ हजार २७६ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत.
साता-या पेक्षा सांगली जिल्ह्यात कमी टँकर सुरू असले तरी सांगली जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ८८ नागरिक आणि ५५ हजार ५४३ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहे. साता-यात ३ लाख ६ हजार ८१ नागरिक तर १ लाख १७ हजार १८५ पशुधन दुष्काळाने प्रभावित झाले आहे.
------------
विभागातील टँकरची आकडेवारी :
  सोलापूर : सांगोला ४८,मंगळवेढा ५४,माढा १५,करमाळा ३४,माळशिरस ११, मोहोळ ८,दक्षिण सोलापूर २२,उत्तर सोलापूर १२,अक्कलकोट ११, बार्शी ८.
  सातारा : माण ९५,खटाव ३१,कोरेगाव ३१,फलटण १९, वाई ५,खंडाळा  १ ,पाटण २,जावळी ३, महाबळेश्वर २,सातारा १,कराड २.
  सांगली : जत १०३,कवठेमहाकाळ १३,तासगाव ११,खानापूर १४,आटपाडी ३३.    
  पुणे : आंबेगाव २१,बारामती ३७,दौंड २०,हवेली ८,भोर १,इंदापूर १०,जुन्नर १४,खेड ६,पुरंदर २१,शिरूर २३, वेल्हा २.

Web Title: Drought has increased; 757 tankers started due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.