‘अवकाळी’ग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By admin | Published: April 13, 2015 06:14 AM2015-04-13T06:14:17+5:302015-04-13T06:14:17+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे

Drought-hit farmer winds! | ‘अवकाळी’ग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

‘अवकाळी’ग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

Next

बापू बल्ौकर, पुणे
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे. ती तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली आहे; मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमाच झाली नाही. फक्त इंदापूर तालुक्यात १00 टक्के वाटप झाले आहे.
जिल्ह्यात जानेवारी वगळता दर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी धास्तावला आहे. दर महिन्यात तो पावसाचा सामना करीत उरलेले पीक कसेबसे वाचविण्याचा प्रयत्न करतो, तोच पुन्हा पाऊस पडत आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ४ हजार २३४ हेक्टरवरील भात व ४५३.२६ हेक्टरवरील द्राक्षपिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर २८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानंतर आता १0 व ११ एप्रिल असे दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात अवकाळीने हैदोस घातला आहे.
नोव्हेंबर व डिसेंबर २0१४ रोजी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी वेल्हा, खेड, आंबेगाव, इंदापूर, बारामती तालुक्यांसाठी चार महिन्यांनंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २ लाख ४४ हजार ९१ लाख
८५0 रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.
ही रक्कम ३० मार्च २0१५ रोजी प्रशासनाने तहसीलदारांच्या खात्यात जमाही केली आहे. मात्र, याचे अद्याप या तालुक्यात वाटपच झाले नाही. फक्त इंदापूर तालुक्याने ही रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.
वेल्हेचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, हे अनुदान ३१ मार्च रोजी मंजूर झाल्याने तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे नंबर उपलब्ध नसल्याने हे अनुदान लॅप्स करून हेच अनुदान एप्रिल महिन्यात परत येणार आहे. ते आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असे सांगितले.
खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे म्हणाले, की धनादेश बनविण्याचे काम सुरू असून, ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. ३१ मार्चला अनुदान खात्यात जमा झाल्याने ते परत जाणार नाही.
बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण हे वैयक्तिक अडचणींमुळे बाहेर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वाटपाचे चेक तयार आहेत. मात्र, त्यांच्या सहीमुळे ते खात्यात जमा झाले नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
इंदापूरचे तहसीलदार संजय पावार यांनी मात्र आलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. ते म्हणाले, की मार्च २0१४ रोजी अवकाळीने मोठे नुकसान झाले होते. यावेळची भरपाई वाटप करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची बँक खाती घेतली होती. ती आमच्याकडे असल्याने ही रक्कम लगेच त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.

Web Title: Drought-hit farmer winds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.