पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढली ; २६४ टँकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 05:12 PM2019-02-20T17:12:48+5:302019-02-20T17:16:19+5:30

पुणे, सांगली, सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात टँकरची संख्या कमी होती. मात्र,

Drought situation in Pune division increased; 264 water tanker started | पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढली ; २६४ टँकर सुरू

पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढली ; २६४ टँकर सुरू

Next
ठळक मुद्देसांगलीत ७७, साताºयात ७२ तर पुण्यात ६४ टँकर      पुणे विभागातील ५ लाख ५२ हजार ५२२ नागरिक आणि २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळाने बाधित

पुणे : दुष्काळाची तीव्रता वाढली असून पुणे विभागातील ५ लाख ५२ हजार ५२२ नागरिक आणि २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहेत. त्यात सांगली जिल्ह्यात ७७, साताऱ्यात ७२, पुण्यात ६४ आणि सोलापूर जिल्ह्यात ५१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या वीस दिवसात पुणे विभागात जिल्हा प्रशासनाला ६४ टँकर सुरू करावे लागले आहेत.
राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यातील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील एकट्या माण तालुक्यात ५५ टँकर सुरू आहेत. तर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. 
पुणे, सांगली, सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात टँकरची संख्या कमी होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील टँकरची संख्याही ५१ वर गेली असून सोलापूरात १ लाख ३८ हजार ९३३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहे.
पुणे विभागात २ फेब्रुवारी रोजी २०० टँकरने दुष्काळ बाधितांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, दुष्काळाची तीव्रता चांगली वाढली असून २० फेब्रुवारी रोजी विभागात २६४ टँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे अवघ्या २० दिवसात विभागातील टँकरची संख्या ६४ ने वाढली आहे. त्यातही २४९ गावे आणि १ हजार ७७१ वाड्यातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत असून ४५ शासकीय आणि २१९ खासगी टँकर्सने पाणी पुरवठा सुरू आहे.
---
जिल्हा व तालुकानिहाय टँकर व बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे : 
पुणे : आंबेगाव ७, बारामती १९, दौंड ९, हवेली १, इंदापूर १, जुन्नर ३, खेड ४, पुरंदर ३, शिरूर १७
सातारा : माण ५४, खटाव ७, कोरेगाव ८, फलटण २,
सांगली : जत ४२, कवठेमहांकाळ ६, तासगाव ३, खानापूर ६, आटपाडी १९,
सोलापूर : सांगोला ११, मंगळवेढा १४, माढा ४, करमाळा ७, माळशिरस ३, मोहोळ ३, दक्षिण सोलापूर ४, उत्तर सोलापूर २, अक्कलकोट २ आणि बार्शी १.

Web Title: Drought situation in Pune division increased; 264 water tanker started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.