भोर एसटी स्टँडची पुन्हा दुरवस्था

By admin | Published: July 28, 2014 05:38 AM2014-07-28T05:38:41+5:302014-07-28T05:38:41+5:30

मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी, जुन्या इमारतीचे गळके छप्पर, खुर्च्यांचा फक्त सांगाडा, संंरक्षक भिंतीची पडझड, स्वच्छतागृहाची भयानक अवस्था अशी स्थिती आहे

Drought ST Stand again dilemma | भोर एसटी स्टँडची पुन्हा दुरवस्था

भोर एसटी स्टँडची पुन्हा दुरवस्था

Next

भोर : मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी, जुन्या इमारतीचे गळके छप्पर, खुर्च्यांचा फक्त सांगाडा, संंरक्षक भिंतीची पडझड, स्वच्छतागृहाची भयानक अवस्था अशी स्थिती आहे भोर एसटी स्टँडची. यामळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
तीन वर्षांपूर्वी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून नवीन एसटी स्टँड बांधण्यात आले. संपूर्ण स्टँडमध्ये डांबरीकरण केले; मात्र निकृष्ट कामामुळे डांबरीकरणाला मोठे-मोठे खड्डे पडून त्या डबक्यात पाणी साचत आहे. त्यातून डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.
स्टँडची जुनी इमारत गळते. त्यामुळे प्रवाशांना त्यात उभे राहताच येत नाही. बसण्यासाठी असणाऱ्या खुर्च्यांचा फ क्त सांगाडाच उरला आहे. नवीनच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत निकृष्ट कामामुळे पडलेली आहे. त्यामुळे प्रवाशांसह जनावरांचा वावर स्टँडवर सुरू आहे. नवीन बांधलेली स्वच्छतागृहे खराब झाली असून त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.
शासनाने लाखो रूपये खर्च करूनही आगाराच्या दुर्लक्षामुळे स्टँॅडची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण स्टँडच्या भिंतीवर जाहिरात बॅनर, पोस्टर लागल्याने स्टँडच झाकून गेले आहे. परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा गराडा नित्याचाच आहे. स्टँॅड परिसरात सोयीसुविधांचा अभाव असल्याने प्रवासी नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
संरक्षक भिंतीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. जुन्या इमारतीची अंतर्गत व्यवस्था बदलून प्रवाशांसाठी सोय करणार असल्याचे आगारप्रमुख एस. ए. भोंडवे यांनी सांगितले.

Web Title: Drought ST Stand again dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.