दुष्काळाच्या झळांनी आटले पाणी : सात वर्षांनी प्रथमच ब्रिटीशकालीन धरणाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:07 IST2019-06-01T16:05:47+5:302019-06-01T16:07:10+5:30
वीर (ता.पुरंदर) धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटीशांनी बांधलेले धरण दिसु लागले आहे. गेले अनेक वर्ष धरण पाण्यात राहुनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे.

दुष्काळाच्या झळांनी आटले पाणी : सात वर्षांनी प्रथमच ब्रिटीशकालीन धरणाचे दर्शन
राहुल वाघोले
पुणे (परिंचे) : वीर (ता.पुरंदर) धरणातीलपाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटीशांनी बांधलेले धरण दिसु लागले आहे. गेले अनेक वर्ष धरण पाण्यात राहुनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे. सात वर्षानंतर पुन्हा वर आलेल्या हे जुने धरण पाहण्यासाठी नागरिक या ठिकणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
१९२० ते १९२७ साली या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. याच दरम्यानच्या काळात भाटघर धरण बांधण्यात आले. १९१३ साली भाटघर धरण बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२८ साली हे धरण पूर्ण करण्यात आले. वीर धरणाची क्षमता कमी असल्याने या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याची संकल्पना पुढे आली. नविन वीर धरणाचे बांधकाम १९६२ साली सुरू करण्यात आले. १९६४ साली हे धरण पूर्ण झाले. १९६७ साली या धरणातून कालव्याद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या धरणाच्या बांधकामा विषयावर परिसरातील अनेक जुन्या जेष्ठ नागरिकांनी मजूरी केली असल्याचे सांगतात. नीरा नदीवर १९९६ साली नीरा देवघर धरण बांधण्यास सुरुवात करुन २००७ साली देवघर धरण पूर्ण करण्यात आले.
जुने वीर धरण पहाताना पाणी अडविण्यासाठी धरणाचा घालण्यात आलेला बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, जुने पावर हाऊस, धरणाचा डावा व उजवा कालव्या व्दारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व कालव्यावर जाण्यासाठीचे साकव पुल, कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था आदी ब्रिटिश कालीन धरणाचे अवशेष सुस्थितीत आजही सुस्थितीत आहेत. १९६२ साली या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण करून १९६७ धरणातून पहिले आवर्तन कालव्याद्वारे सोडण्यात आले होते.