पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेलमधून सर्रास ड्रग्स विक्री; अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 05:38 PM2024-06-23T17:38:39+5:302024-06-23T17:39:55+5:30
पुण्यातील प्रमुख अशा फर्ग्युसन रस्त्यावरील नामांकित हॉटेलमधून अल्पवयीन मुलांना ड्रग्सबरोबर दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर
पुणे: पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे दिसतंय. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब, हॉटेल आणि बारवर पोलीस कारवाई सुरु झाली होती. हॉटेल्सला अल्पवयीन मुलांना दारू देण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच दारूच्या दुकानातूनही २१ वर्षांखालील मुलांना दारूविक्री केली जात नव्हती. मात्र आता सरार्सपणे मुलांना ड्रग्स दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे पोलीस प्रशासन नक्की काय करतंय असा सवाल उपस्थित होतोय.
पुणे मध्यंतरी ड्रग्सचे हबच बनले होते. शहरासह उपनगरात ड्रुग्स विक्री करणारे आढळून आले होते. पोलिसांच्या कारवाईत कोट्यवधींचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी तर प्रत्येकी पोलीस ठाण्याला ड्रग्स संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आता फर्ग्युसन रस्त्यावरील प्रकरणानंतर पोलीस कारवाई थंड झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. या प्रमुख रस्त्यावरील हॉटेलमधून अशा प्रकारे सर्रास विक्री होत असल्याने पोलीस काय कारवाई करतील. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.