महिलेकडून साडेसहा लाखांचे अमली पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:24+5:302021-03-30T04:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा भागात गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेला अमली पदार्थ विरोधी पथकाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा भागात गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. समीना मेहमूद शेख (वय ३५, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून २१ किलो गांजा, चरस तसेच मोबाईल असा ६ लाख ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस नाईक मनोज साळुंके यांना शेख घरातून अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी शेख हिच्या घरावर छापा घालून तेथून २१ किलो गांजा, ५६९ ग्रॅम चरस, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, रेहाना शेख आदींनी ही कारवाई केली.