‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची ११५ जणांवर कारवाई
By admin | Published: January 1, 2017 04:40 AM2017-01-01T04:40:09+5:302017-01-01T04:40:09+5:30
नववर्ष स्वागताच्यानिमित्ताने शहरामध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या ११५ जणांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली. शुक्रवार आणि
पुणे : नववर्ष स्वागताच्यानिमित्ताने शहरामध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या ११५ जणांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवस केलेल्या कारवाईची ही आकडेवारी आहे. दहा विशेष वाहनांच्या मदतीने तीन दिवस सलग जनजागृती करण्यात आल्यानंतर, थेट कारवाईला सुरुवात करण्यात आली.
थर्टी फस्टच्या निमित्ताने शहरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. पार्ट्यांमध्ये तसेच बारमध्ये मद्यपान करुन वाहन चालवल्यामुळे अनेकदा किरकोळ, तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. यामुळे निरपराध नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या कारवाईसाठी पोलिसांनी १०० ब्रेथ अॅनालायझरचा वापर केला असून मध्यरात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती. यासोबतच घातपाती कारवाया आणि गडबड गोंधळ टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच हजार पोलीस सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. कोरेगाव पार्क, चांदनी चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड, एफसी रोड, जंगली महाराज रोड, एमजी रोड या ठिकाणी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली होती.
(प्रतिनिधी)