मदयधुंद दुचाकीस्वाराची चूक! ट्रकला धडक, मात्र जीव गमावला मित्राने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:40 PM2023-02-12T15:40:52+5:302023-02-12T15:41:03+5:30
मद्यप्राशन करुन भरधाव दुचाकी चालवणे जीवावर बेतले
पुणे: मद्यप्राशन करुन भरधाव दुचाकी चालविताना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहप्रवासी तरुणाचा मृत्यु झाला.
अमोल अशोक जाधव (वय ३५, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) असे मृत्यु पावलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी करण ऋषीराज कदम (वय २९, रा. नक्षत्र सोसायटी, नऱ्हे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. करण कदम हाही जखमी झाला आहे. हा अपघात जवाहरलाल नेहरु रोडवरील रामोशी गेट पोलीस चौकी ते पेट्रोल पंप दरम्यान ९ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण कदम याने मद्यप्राशन करुन दुचाकीवर त्याचा मित्र अमोल जाधव याला घेऊन जात होता. भरधाव जाताना त्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात तो स्वत: जखमी झाला. त्याचा मित्र अमोल जाधव याचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार तपास करीत आहेत.