Pune Crime: दारूच्या नशेत आर्थिक देवाण-घेवणीतून एकाचा खून; खेडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:21 IST2023-06-19T12:20:45+5:302023-06-19T12:21:26+5:30
खेड पोलिसांकडून आरोपीला अटक...

Pune Crime: दारूच्या नशेत आर्थिक देवाण-घेवणीतून एकाचा खून; खेडमधील घटना
राजगुरूनगर (पुणे) : दारूच्या नशेत पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात मजुराचा खून झाल्याची घटना दि. १७ रोजी चांडोली (ता खेड) येथे घडली आहे. संतोष शिवाजी माळी (रा. खंडोबा माळ, राजगुरूनगर, मूळ रा. अंकाईवाडी, ता. येवला, जि. नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत आरोपी महादेव मुकणे (वय ४०, रा. चांडोली) याला खेड पोलिसांनी अटक केली असून खुनाची कबुली दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमा नदीचे जुने पुलाचे जवळ चांडोली कडूस जाणारे रोडलगत आरोपी महादेव मुकणे याने किरकोळ पैशाच्या कारणावरून दारूच्या नशेत मयत संतोष माळी यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी धागेदोरे शोधत आरोपी महादेव मुकणे याला तत्काळ अटक केली. मयताची पत्नी सुनीता संतोष माळी यांनी खेड पोलिस ठाण्यात खुनाची फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.