राजगडच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:26+5:302021-04-12T04:10:26+5:30

कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी शनिवार (१० एप्रिल) तसेच रविवारी (११ एप्रिल) टाळेबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार ...

Dryness everywhere in the working area of Rajgad | राजगडच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र शुकशुकाट

राजगडच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र शुकशुकाट

Next

कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी शनिवार (१० एप्रिल) तसेच रविवारी (११ एप्रिल) टाळेबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने नसरापूर, खेड शिवापूर, कापूरव्होळ, किकवी व सारोळा आदी बाजारपेठ ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.

नसरापूर, शिवापूर, कापूरव्होळ येथील व्यापारी आणि नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रतिसाद दिला. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी नागरिक दूध, वृत्तपत्रे खरेदीसाठी बाहेर पडले. दुपार नंतर सर्व रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले. एरवी गजबजलेला चेलाडी फाटा, नसरापूर बाजारपेठ,शिवापूर पेठ , शिवापुर बाग, कापूरव्होळ चौक, सारोळा चौक व रस्त्यासह सर्व भागात नीरव शांतता होती. औषध विक्री दुकाने वगळता शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

लसीकरणासाठी काही नागरिक सकाळी बाहेर पडले. शहरातील महत्त्वाचे चौक तसेच रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पोलिसांकडून कठडे उभे करून नाकाबंदी करण्यात आली होती.पुणे सातारा महामार्ग, नसरापूर- वेल्हा रस्त्यांवर कागदपत्र तसेच ओळखपत्र पाहून वाहनचालकांना सोडण्यात येत होते.विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात राजगड पोलिसांनी कारवाई केली.

सोबत

पुणे सातारा महामार्गासह गावोगावी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Dryness everywhere in the working area of Rajgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.