डीएसके दाम्पत्याला मंगळवारपर्यंत दिलासा;सरकार पक्षाने मागितली मुदत, दिवसभरात २५ कोटींच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:59 PM2017-11-04T23:59:08+5:302017-11-04T23:59:18+5:30

गुंतवणकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना सत्र न्यायालयाने मंगळवारपर्यंत दिलासा दिला आहे.

DSK couple gets relief till Tuesday, government asks for deadline | डीएसके दाम्पत्याला मंगळवारपर्यंत दिलासा;सरकार पक्षाने मागितली मुदत, दिवसभरात २५ कोटींच्या तक्रारी

डीएसके दाम्पत्याला मंगळवारपर्यंत दिलासा;सरकार पक्षाने मागितली मुदत, दिवसभरात २५ कोटींच्या तक्रारी

Next

पुणे : गुंतवणकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना सत्र न्यायालयाने मंगळवारपर्यंत दिलासा दिला आहे़ सरकार पक्षाने बाजू मांडण्यासाठी मुदत देण्याची विनंती केल्याने विशेष न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी येत्या मंगळवारी ठेवली आहे़
आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयातील सत्र न्यायालयात धाव घेतली होती़ त्यावर शनिवारी सुनावणी झाली़
पैसे वसूल करायची ही जागा नाही़ कस्टडीत टाकून पैसे मिळू शकणार नाहीत; ते बाहेर राहिले तर पैसे गोळा करु शकतात़ अशा आशयाच्या उच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा दाखलाही त्यांनी दिला़ त्यानंतर सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी सरकार पक्षाला बाजू मांडण्यासाठी मुदत द्यावी अशी विनंती केली़

९४५ तक्रारी
सुटी असल्याने शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती़ ३४५ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील रक्कम २५ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे़ आतापर्यंत ९४५ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत़ मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले़

७० बँकांमधील खाती गोठवली
डीएसके उद्योगसमूहाच्या विविध बँकांमधील सुमारे ७० खाती गोठविली असून, त्यासाठी इंडियन बँक असोशिएशनला पत्र देण्यात आले आहे़ याशिवाय ईडी आणि सेबीकडेही अर्ज करण्यात आला आहे़ तसेच डीएसके उद्योगसमूहाच्या मालकीच्या जमिनीचे व्यवहार परस्पर होऊ नये, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने नोंदणी महानिरीक्षकांनाही पत्र पाठविले आहे़

Web Title: DSK couple gets relief till Tuesday, government asks for deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.