‘डीएसकें’ची देणी बावीसशे कोटींची, हस्तांतरण फक्त ८२७ कोटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:44+5:302021-08-17T04:14:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (‘डीएसकेडीएल’) ही सार्वजनिक कंपनी विकत घेण्यासाठी (टेकओव्हर) अजदान ...

DSK owes Rs 22 crore, transfers only Rs 827 crore | ‘डीएसकें’ची देणी बावीसशे कोटींची, हस्तांतरण फक्त ८२७ कोटीत

‘डीएसकें’ची देणी बावीसशे कोटींची, हस्तांतरण फक्त ८२७ कोटीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (‘डीएसकेडीएल’) ही सार्वजनिक कंपनी विकत घेण्यासाठी (टेकओव्हर) अजदान प्रॉपर्टीज प्रा. लि., क्लासिक प्रमोटर ॲण्ड बिल्डर प्रा. लि., अतुल बिल्डर्स या तिन्ही कंपन्यांनी मिळून दिलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे मालकीसाठी प्रस्ताव दाखल केलेली प्रमुख कंपनी ‘अजदान’कडे डीएसकेडीएल हस्तांतरित होणार आहे.

‘अजदान’कडून ८२७ कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, मुळातील देणी ही २२०० ते २३०० कोटी रुपयांची आहेत. यातल्या अठराशे कोटी रुपयांची देणी बँकांची आहेत. ठेवीदारांची देणी ही साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांची आहेत. त्यामुळेच अवघ्या ८२७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य केल्याने आता किती जणांची देणी कशी फिटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रिझोलेशन प्रोफेशनल मनोज कुमार अगरवाल यांनी याबाबत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडला पत्र पाठवून माहिती दिली आहे. अजदान कंपनीचा प्रस्ताव मान्य करण्यात आलेल्याचे आपल्या रेकाॅर्डवर घ्यावे, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. डीएसकेडीएल विकत घेण्याबाबतचा प्रस्ताव (रिझोलेशन प्लॅन) त्यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाकडे (एनसीएलटी) सादर केला आहे. या प्रस्तावास कमिटी ऑफ क्रेडिटर (सीओसी) ची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निर्णयायासाठी एनसीएलटीकडे पाठविण्यात आला होता. त्यात मंत्रा प्रॉपर्टीज प्रा. लि, अजदान प्रॉपर्टीज प्रा. लि., क्लासिक प्रमोटर ॲण्ड बिल्डर प्रा. लि., अतुल बिल्डर्स या दोन कंपन्यांची नावे अंतिम करण्यात आली होती.

डीएसके यांच्या एकूण मालमत्तेपेकी सुमारे ९५ टक्के हिस्सा हा डीएसकेडीएल कंपनीचा आहे. त्यामुळे या कंपनीची विक्री झाल्यानंतर ठेवीदारांचे व बँकेचे पैसे कसे परत करणार, अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींचे बांधकाम कसे व कधी पूर्ण करणार, पैसे परत करण्याची व बांधकाम करण्याची कालमर्यादा काय आहे, अशा सर्व बाबी दोन्ही कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आल्या आहेत.

चौकट

“देय रक्कम ही मंजूर प्रस्तावापेक्षा अधिक असल्याने ठेवीदारांना किती पैसे मिळणार, हा प्रश्न आहे. ठेवीदारांना गुंतवलेली पूर्ण रक्कम मिळणे अपेक्षित आहे. तसे असेल तर आमची काही तक्रार नाही. पण तसे न झाल्यास आम्ही संबंधित यंत्रणेकडे दाद मागणार आहोत. ठेवीदारांमुळे ही केस झाली आहे. त्यांना किती पैसे मिळणार आहेत, हा प्रश्न महत्वाचा आहे.”

-ॲड. आशिष पाटणकर, शिरीष ‘डीएसके’ यांचे वकील

Web Title: DSK owes Rs 22 crore, transfers only Rs 827 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.