गैरव्यवहारात डीएसके यांचे भाऊ, मेहुणीचा सहभाग : पोलिसांनी केले आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:29 PM2018-05-18T16:29:44+5:302018-05-18T16:29:44+5:30

आर्थिक गुन्हे शाखेने भावाचे जावई व मुलगी तसेच कंपनीतील महत्वाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या अन्य नातेवाईकांवर अटकेचा फास आवळला जात आहे़.  सध्या त्यांचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़. 

Dsk relatives involved in mismanagement : Police accused of doing so | गैरव्यवहारात डीएसके यांचे भाऊ, मेहुणीचा सहभाग : पोलिसांनी केले आरोपी

गैरव्यवहारात डीएसके यांचे भाऊ, मेहुणीचा सहभाग : पोलिसांनी केले आरोपी

Next
ठळक मुद्देठेवीदार फसवणूक प्रकरण डिएसकेडीएल या पब्लिक लिमिटेड कंपनीचा पैसा जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या नावाखाली खोटे व बनावट दस्ताऐवज  ड्रिम सिटी मधील कर्जरोख्यांसाठी फुरसुंगी येथील जमीन स्टेट बँकेकडे गहाण

विवेक भुसे
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़. एस़. कुलकर्णी यांच्या भावाच्या जावई व मुलीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यात त्यांचा मोठा भाऊ, त्यांच्या दोन मुली, त्यांची बहीण आणि हेमंती यांची बहीण यांचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे़. पोलिसांनी त्यांना आरोपी केले असून त्यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे़. 
मोठे भाऊ मकरंद सखाराम कुलकर्णी, त्यांची मुलगी शिल्पा मकरंद कुलकर्णी, स्वरुपा मकरंद कुलकर्णी, बहीण अश्विनी संजय देशपांडे, हेमंती कुलकर्णी यांची बहीण अनुराधा रामचंद्र पुरंदरे आणि शिरीष कुलकर्णी यांची पत्नी तत्वी शिरीष कुलकर्णी यांचा जमीन खरेदी विक्रीमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्यांना आरोपी केले आहे़. या सर्व जणांचा प्रामुख्याने ड्रिम सिटीमधील जमीन खरेदी विक्रीमध्ये सहभाग होता़. त्यांच्या नावावर ड्रिम सिटीमधील जमिनी खरेदी करण्यात आल्या़. त्यानंतर त्या डीएसकेडीएल या पब्लिक लि़ कंपनीला दीड ते दोन पट जादा भावाने विकण्यात आल्या़. 
 डी़. एस़. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, केदार वांजपे, अनुराधा पुरंदरे, धनंजय पाचपोर, शिरीष कुलकर्णी यांनी पूर्वनियोजित कट करुन डिएसकेडीएल या पब्लिक लिमिटेड कंपनीचा पैसा जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या नावाखाली खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करुन आतापर्यंत १३६ कोटी निष्पन्न झाली असून त्या अधिकची रक्कम निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे़. ड्रिम सिटीमधील जमीन खरेदी विक्री व्यवहारात जवळपास २६५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे़. ड्रिम सिटी जमीन खरेदी विक्रीचा गैरव्यवहार प्रामुख्याने २००६ ते २००८ यादरम्यान झाल्याचे दिसून येत आहे़. 
डीएस़के यांच्या कंपनीत केदार वांजपे हे १ एप्रिल २००५ ते ८ आॅगस्ट २००९ अभियंता विभागात कायदेशीर विभागाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते़. केदार व सई वांजपे यांच्या मालमत्तेत अल्पावधीत करोडोची वाढ झालेली आहे़. या कालावधीत १३६ कोटी रुपयांचा अपहार झाला आहे़ .
धनंजय पाचपोर हे १ जुलै २००६ ते १ जुलै २००७ या कालावधीत पीआरओ, सहायक मॅनेजर, उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करीत होते़. विनयकुमार बडमंदी हे मे २००७ पासून डीएसके यांच्या कंपनीत जनरल मॅनेजर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट अकाऊंट अँड फायनान्स तसेच सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट कॉपोरेट अफेअर्स अशा विविध पदावर कार्यरत होते़. या सर्व गैरव्यवहारातील सुनियोजित कटात त्यांचा सहभाग आहे़. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या मालमत्तेत काही काळातच मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे़. त्याचबरोबर इतक्या अल्पकाळात त्यांना इतकी प्रमोशन कशी मिळाली याचाही पोलीस तपास करीत आहेत़.
 ड्रिम सिटी मधील कर्जरोख्यांसाठी फुरसुंगी येथील जमीन स्टेट बँकेकडे गहाण ठेवली होती़. तरी त्या जमिनीचा बनावट नकाशा तयार करुन या जमिनीवर कुठलेही गहाणखत असे भासवून ठेवीदारांची रक्कम मिळत नसताना २०१६ च्या शेवटी विनयकुमार बडगंडी व इतरांनी ठेवीदारांना ठेवीच्या बदल्यात या जमिनीचे प्लॉट देतो, असे सांगून अलॉटमेंट लेटर दिले. ठेवीच्या पावत्यांचे पैसे दिल्याचे भासविले़ प्रत्यक्षात ठेवीची रक्कमही मिळाली नाही व प्लॉटसुद्धा गहाण तसेच ही जागा पब्लिक लिमिटेड लिस्टेंड कंपनीची असल्याने भागीदारी संस्थांच्या ठेवीदारांना पब्लिक लिमिटेड कंपनीची मालमत्ता मिळू शकणार नाही, हे माहिती असताना सुद्धा त्यांनी यासारखे प्लॅन करुन त्याद्वारे ठेवीदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे़. 

Web Title: Dsk relatives involved in mismanagement : Police accused of doing so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.