डीएसकेंच्या जागांचा होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:36 AM2018-02-22T03:36:39+5:302018-02-22T03:36:57+5:30
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या बालेवाडी व फुरसुंगी येथील जागेचा लिलाव होणार आहे़
पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या बालेवाडी व फुरसुंगी येथील जागेचा लिलाव होणार आहे़
सेंट्रल बँक आॅफ इंडियाने याबाबतची अंतिम विक्री सूचना जाहीर केली असून हा लिलाव ८ मार्च रोजी बँकेच्या कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील शाखेत सकाळी ११ वाजता होणार आहे़
कुलकर्णी यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडियाकडून ६६ कोटी ३९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते़ परंतु, डीएसके यांनी हे कर्ज व त्यावरील व्याज यांची परतफेड केलेली नाही़ त्यांनी बालेवाडी येथील सर्व्हे नं़ ४४ मधील हिस्सा १ ए, हिस्सा ३ बी, हिस्सा १० बी, हिस्सा ४ आणि हिस्सा ११ या जागा तारण ठेवल्या होत्या़ त्यांचा लिलाव होऊ शकतो़
डी़ एस़ के. यांनी कर्जाची परतफेड न केल्याने सेंट्रल बँक आॅफ इंडियाने १२ एप्रिल २०१७ रोजी जाहीरपणे मागणी केली होती़ त्याला प्रतिसाद न मिळाल्याने या जागांचा ६ नोव्हेंबर रोजी कागदोपत्री ताबा
घेतला होता़
त्यांची जाहीर नोटीस देऊन त्यांनी सर्व संबंधितांना कळविले होते़ तरीही त्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने शेवटी या तारण मालमत्तेचा लिलाव करण्याचा जाहीर केले आहे़ या तारण जागांची राखीव किंमत ६६ कोटी ३९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे़
या लिलावात भाग घेण्यासाठी ६६ लाख ३० हजार रुपये बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे़ ही लिलावात भाग घेणाºयांनी ७ मार्चपर्यंत बँकेच्या महात्मा गांधी रोडवरील शाखेत जमा करायची आहे़