एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

By Admin | Published: March 27, 2017 01:57 AM2017-03-27T01:57:35+5:302017-03-27T01:57:35+5:30

वसंताच्या आगमनाबरोबर निसर्गात पशुपक्षांच्या आगमनालाही उधाण आले आहे. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळे तलाव, धरणे, नद्यांमध्ये

Duck pigs were beautiful in a pool | एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

googlenewsNext

नीलेश काण्णव / भीमाशंकर
वसंताच्या आगमनाबरोबर निसर्गात पशुपक्षांच्या आगमनालाही उधाण आले आहे. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळे तलाव, धरणे, नद्यांमध्ये विणीच्या हंगामासाठी परदेशी पाहुणे आले आहे. त्यांनी घरटी थाटून त्यात अंडी घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु, उन्हाळ्याची वाढती तीव्रता व कमी होत चाललेले पाणी. यामुळे या परदेशी पाहुण्यांनाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत.
डिसेंबर ते एप्रिल या विणीच्या हंगामात पुणे जिल्ह्यात उजनीचा विस्तीर्ण जलाशय, पिंपळगाव जोगे धरण, भादलवाडीचा ब्रिटिशकालीन तलाव, घोड, भीमा नद्यांपासून भोसरी-निगडी पुण्यासारख्या शहरांमध्ये असलेल्या छोट्या-मोठ्या तलावांमध्येही हे परेदशी पाहुणे पाहावयास मिळतात. यामध्ये राखी बगळे, हळदी कुंकू, चित्रबलक, थापट्या, उघड्या चोचीचा करकोचा, शराटी, नदीसुरय, करोता, पाणकोंबड्या,फ्लेमिंगो, ग्रे-हेरॉन, स्पून बील, स्पॉट बील, ब्लॅक हेडेड, ब्राह्मणी डक अशा विविध प्रकारच्या पक्षांचे आगमन झाले आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पक्षी येऊ लागतात व डिसेंबरमध्ये त्यांची संख्या वाढते. जानेवारीमध्ये विणीच्या हंगामासाठी येणारे पक्षी मोठ्या संख्येने दिसतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे विणीचा हंगाम संपवून पुन्हा जाण्यासाठी सज्ज होता. दरवर्षी हे पक्षी विणीच्या हंगामात पिलांना जन्म देऊन संगोपन करतात व त्यांच्या पंखात बळ आल्यानंतर येथून घेऊन जातात. विणीसाठी पक्षी झाडीलगतचा पाणीसाठा, पाथळीची ठिकाणे, उथळ पाण्याची ठिकाणे, जुनी झाडे या ठिकाणी घरटी करतात. आकाराने इवल्याशा बोटाएवढ्या पक्ष्यांपासून तर अगदी मोठ्या करकोच्यांपर्यंत वेगवेगळ्या आकारांचे पक्षी हजारो किमीचा प्रवास दरवर्षी करतात. परदेशी पक्षी तापमानातील बदल, हवामान, विणीची गरज, जनुकीय आदेश अशा विविध कारणांसाठी स्थलांतर करतात. हा प्रवास करताना पक्ष्यांना प्रकाश, हवामान यामुळे दिशा समजत जाते. प्रवास करताना वाटेत असंख्य अडथळे पार करावे लागतात. हवामान व एखाद्या बलवान पक्ष्याचा सामना करत त्यांना प्रवास करावा लागतो.

माळढोकदेखील विणीसाठी प्रवास करतात. गेल्या वर्षी वन्यजीव विभाग पुणे यांनी एका माळढोक पक्ष्याला ट्रान्समिटर बसविला होता. त्याद्वारे माळढोक वर्षभरात १६०० चौ.किमी फिरल्याची नोंद झाली. यामध्ये अक्कलकोटपासून लातूरपर्यंत त्याचा प्रवास झाला. शेती, उजाड माळरान अशा ठिकाणी त्याने जास्त वास्तव्य केले व पावसाळयात सप्टेंबर आॅक्टोबरमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे विणीसाठी आला. - सुनील लिमये,
मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग

Web Title: Duck pigs were beautiful in a pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.