जागा निश्चित न झाल्यामुळे माळीणचे पुनर्वसन रखडले

By admin | Published: July 27, 2015 03:33 AM2015-07-27T03:33:59+5:302015-07-27T03:33:59+5:30

माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही माळीणचे लोक पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या १२५ चौरस फूट जागेत राहत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे

Due to the absence of the seats, the rehabilitation of Malini was stopped | जागा निश्चित न झाल्यामुळे माळीणचे पुनर्वसन रखडले

जागा निश्चित न झाल्यामुळे माळीणचे पुनर्वसन रखडले

Next

घोडेगाव : माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही माळीणचे लोक पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या १२५ चौरस फूट जागेत राहत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे माळीण पुनर्वसनाची जागा लवकर निश्चित झाली नाही. प्रशासनाने जागा शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला; मात्र आवश्यक आठ एकर जागा व ग्रामस्थांच्या सोयीची जागा लवकर न मिळाल्याने पुनर्वसन रखडले आहे.
दि. ३० जुलै २०१४ रोजी माळीण येथे अतिवृष्टीमुळे गावावर दरड कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये ४४ कुटुंबांतील १५१ लोक मरण पावले. या दुर्घटनेत पूर्ण घरे गाडली गेली. यातूनही सुदैवाने वाचलेल्या लोकांचे तात्पुरते पुनर्वसन तातडीने करण्याची आवश्यकता होती. यासाठी माळीण फाट्यावरील शाळेच्या पटांगणावर ४० तात्पुरती निवारा शेड बांधून येथे व्यवस्था करण्यात आली.
तात्पुरता निवारा झाला; मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा शोधून तातडीने पक्की घरे बांधणे हे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. हा आदिवासी व दुर्गम भाग असल्याने येथे पडीक जागा भरपूर असतील व जागा मिळून जाईल, असा प्रशासनाचा समज होता. पहिल्या टप्प्यात आडिवरे, झांजरेवाडी व कोकणेवाडी या तीन जागा पाहण्यात आल्या. आडिवरे जागेला माळीण ग्रामस्थांनी सहमतीदेखील दिली; मात्र आडिवरे ग्रामस्थांनी जागा देण्यास तीव्र विरोध केला. सष्टेंबर २०१४ मध्ये झांजरेवाडी व कोकणेवाडीच्या जागेला जागामालकांनी संमती दिली. यातील झांजरेवाडी जागेला जीएसआयने मान्यता दिली. प्रशासनालादेखील ही जागा आवडली; मात्र ती उंच डोंगरावर असल्याने दळणवळणास, शेतीकडे जाण्यास अवघड होईल, म्हणून माळीण ग्रामस्थांनी या जागेला नकार दिला. कोकणेवाडीची जागा लांब असल्याने या जागेला कोणीच पसंती दिली नाही. यानंतर घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत माळीण पुनर्वसनाची जागा ग्रामस्थांना विचारात घेऊनच निश्चित केली जाईल, कोणतीही जागा लादली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
या वेळी ग्रामस्थांनी तात्पुरती निवारा शेड असलेल्या कशाळवाडीच्या जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली.

Web Title: Due to the absence of the seats, the rehabilitation of Malini was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.