‘चिल्लर’मुळे ‘पीएमपी’ बुचकळ्यात;दोन लाख स्वीकारण्यास बॅँकेचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:51 AM2018-10-13T03:51:26+5:302018-10-13T03:51:53+5:30

दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे.

due to bunch of coins 'PMP' in trouble : Bank rejects accepting two lakhs | ‘चिल्लर’मुळे ‘पीएमपी’ बुचकळ्यात;दोन लाख स्वीकारण्यास बॅँकेचा नकार

‘चिल्लर’मुळे ‘पीएमपी’ बुचकळ्यात;दोन लाख स्वीकारण्यास बॅँकेचा नकार

Next

पुणे : दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनासमोर या ‘चिल्लर’चे करायचे काय? असा वेगळाच पेच निर्माण झाला आहे. या ‘चिल्लर’ संकटामुळे प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.


पीएमपीचे एकूण १३ आगार असून त्यामार्फत बसचे दैनंदिन संचलन चालविले जाते. या आगारांमधील बस संचलनातून दररोज जमा होणारी रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या कॅम्प शाखेतील महामंडळाच्या खात्यात जमा केली जाते. तिकीट विक्रीतून दररोज दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. पण बँकेने ४ आॅक्टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगारांमध्ये चिल्लर साठवून ठेवावी लागत आहे. प्रशासनाकडून याबाबत बँकेशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही बँकेने रिझर्व्ह बँकेचा हवाला देत ही रक्कम घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाला मागील आठ दिवसांपासूनची जमा झालेल्या सुमारे १२ ते १५ लाख रुपयांच्या चिल्लरचा संबंधित आगारांमध्येच ढीग लावावा लागत आहे.


बँकेच्या भूमिकेमुळे प्रशासनासमोर चिल्लरचे नवे संकट उभे राहिले आहे. दिवसागणिक चिल्लरचा साठा वाढत जाणार आहे. लाखो रुपयांची चिल्लर बँकेत जमा होत नसल्याने दैनंदिन खर्चावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. तसेच रोजच्या हिशेब नोंदीच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. आधीच पीएमपीची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यातच हे चिल्लर संकट उद्भवल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कामकाजातील सुसूत्रता कायम राखणे अडचणीचे झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: due to bunch of coins 'PMP' in trouble : Bank rejects accepting two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.