अंगारकीनिमित्त जिल्ह्यात दर्शनासाठी गर्दी

By admin | Published: December 9, 2014 11:40 PM2014-12-09T23:40:19+5:302014-12-09T23:40:19+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र दुमदुमली होती. अंगारकीनिमित्त पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

Due to the celebration of Angargi, crowd | अंगारकीनिमित्त जिल्ह्यात दर्शनासाठी गर्दी

अंगारकीनिमित्त जिल्ह्यात दर्शनासाठी गर्दी

Next
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र दुमदुमली होती. अंगारकीनिमित्त पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी आल्याने 
भाविकांनी मोठी गर्दी 
केली होती.
 
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील मयूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री उशिरार्पयत सुमारे पाऊण लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
आज पहाटे गुरव मंडळींची पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनास भक्तांसाठी खुला करण्यात आला. अंगारकी चतुर्थी केल्याने बारा चतुर्थीचे पुण्य मिळत असल्याने भाविकांनी मयूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. 
पहाटे चार वाजल्यापासूनच गुलाबी थंडीचा आस्वाद घेत भाविकांनी बाजारतळार्पयत रांगा लावल्या होत्या.
यामुळे मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते. आज होणारी गर्दी लक्षात घेता चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनरांग, सुरक्षारक्षक, स्वच्छता कामगार आदी चोखव्यवस्था केली होती़  सकाळी सात वाजता सालकरी विजय ढेरे यांची प्रक्षाळ पूजा झाली. तर, देवस्थानतर्फे दुपारची पूजा, नैवेद्य दाखविल्यानंतर अन्नसत्र 12 वाजता सुरू करण्यात आले. अंगारकी चतुर्थी असल्याने अनेक भाविक आपला नवस पूर्तता म्हणून खिचडी, केळी, लाडू आदी वाटत होते.  तर, काहींनी सहकुटुंब श्रींच्या मूर्तीला अभिषेक, पूजा केली.  (वार्ताहर)
 
दिवसभर गर्दीचा ओघ ‘जैसे थे’ 
सायंकाळी सहानंतर पंचक्रोशीतील अनेक भाविकांचा ओघ वाढला. पेठेतील दुकाने आज होणारी गर्दी लक्षात घेता हार, दुर्वा, पेढे, श्रींची प्रतिमा, लाडू आदींनी सजली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’ गजर रात्री उशिरार्पयत सुरू होता. रात्री चंद्रोदयाच्या वेळेस झालेल्या आरतीस शेकडो भाविक उपस्थित होते.
 
सासवड (वार्ताहर) : अंगारकी चतुर्थीनिमित्त सासवड येथील पुरातन गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात फुलांनी सजावट केली होती. या वर्षातील अखेरची अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सासवड येथील सरदार पुरंदरे यांच्या पुरातन भव्य वाडय़ाबाहेर हे भव्य मंदिर आहे. हे मंदिर पेशवाईकाळातील आहे. 
 
रांजणगाव गणपती : वर्षाअखेरीस आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे व उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी दिली.
पहाटे 4 वाजता श्री महागणपतीला अभिषेक, पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. कडक थंडीची तमा न बाळगता भाविकांनी आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. दु. 12 वाजता महापूजा, महानैवद्य आदी धार्मिक कार्यक्रम देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. मकरंद देव यांच्या हस्ते करण्यात आले. 
देवस्थानच्या वतीने मोफत खिचडी वाटप करण्यात आले. महागणपती प्रतिमा असलेली चांदीची नाणी विक्री, दर्शन पास, मोदक प्रसादविक्रीस भाविकांचा प्रंचड प्रतिसाद मिळाल्याचे देवस्थानचे सचिव अॅड. अशोक पलांडे यांनी सांगितले.  अंगारकीनिमित्त मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. (वार्ताहर)
 
ओझर : अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील एक स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे विघ्नहत्र्याच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. सुमारे 1 लाख 5क् हजार भाविकांनी 
रात्री अकरार्पयत श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती श्री विघ्नहर गणपती 
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे यांनी दिली. 
पहाटे चारला देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी यांनी देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, विश्वस्त बबन मांडे, देविदास कवडे, पांडुरंग जगदाळे, विक्रम कवडे, भाविकांचे प्रतिनिधी म्हणून उद्योज गोपाळ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी रांगा करण्यात आले. सकाळी साडेसात व दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. मंदिर चौक परिसरात देवस्थानच्या वतीने दर्शनरांगा व्यवस्था, पिण्याचे पाणी, मंदिर गाभा:यात शनिवारी  स्वतंत्र अभिषेक व्यवस्था, देणगी, वाहनतळ व्यवस्था आदी व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. 
ओझर नगरीत व्यवसायकांनी खेळणी, पेढय़ांची दुकाने, गृहउपयोगी वस्तूंची दुकाने थाटल्यामुळे ओझरला यात्रेचे स्वरूप आले होते. मंदिरामध्ये पोथी वाचन करण्यात आले. चंद्रोदयापर्यत शिवनेरभूषण विठ्ठलबाबा मांडे यांचे हरिकीर्तन झाले. सकाळच्या सत्रत दोन हजार भाविकांनी खिचडी प्रसाद, तर संध्याकाळच्या सत्रत तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री 1क्.3क् वाजता शेजारती करण्यात आली. वारक:यांना अन्नदान गणपत बोडके यांनी केले. गर्दीचे नियोजन विश्वस्त प्रकाश मांडे, ज्ञानेश्वर कवडे, अनिल मांडे, साहेबराव मांडे, शंकर कवडे, शारदा टेंभेकर, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, देवस्थानचे व्यवस्थापक अशोक घेगडे, पांडुरंग कवडे, गणोश टेंभेकर, देवस्थानचे कर्मचारी ओतूर पोलीस स्टेशन व ग्रामस्थांनी केले. 
 
लेण्याद्री :  अंगारकी चतुर्थीच्या औचित्याने गणोशदर्शनाचा योग साधण्यासाठी लेण्याद्रीचा डोंगर गणोशभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. दिवसभरात मोठय़ा प्रमाणात गणोशभक्तांनी श्रीगणोशाचे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणो, खजिनदार सदाशिव ताम्हाणो, विश्वस्त बाजीराव कोकणो, कैलास लोखंडे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, प्रभाकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरिजात्मजास पूजाभिषेक, धार्मिक विधी करण्यात आले. देवस्थान ट्रस्टमार्फत गणोशभक्तांना दिवसभर खिचडी वाटप व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गणोशलेणीतील गिरिजात्मजास फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसा कडक ऊन असल्याने गणोशभक्तांची पायरीमार्गावर दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत होते.
 
दौंड : श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे अंगारकी चतुर्थीनिमित्ताने मोठय़ा भक्तिभावाने भाविकांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, सुमारे 1 ते दीड किलोमीटर अंतरार्पयत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे सिद्धिविनायकाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली. अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांनी पहाटे मंदिर उघडण्यापूर्वीच दर्शनाला रांगा लावल्या होत्या. तसेच, कडाक्याची थंडी असतानादेखील मंदिराच्या परिसरातील व्यापारपेठ गजबजली होती. हार, तुरे, दुर्वा घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. दुपारी आणि सायंकाळी सिद्धिविनायकाची आरती झाली. दरम्यान, सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मोठी गर्दी झाली होती. मात्र, देवस्थानाच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात आल्याने भाविकांची गैरसोय झाली नाही. 
 
4बारामती या वर्षातील अखेरच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त बारामती शहर व परिसरात भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी 
केली होती. 
4बारामतीतील भिगवण चौकातील सिद्धी गणोश मंदिर,तसेच सायली हिल परिसरातील गणोश मंदिरात 
भक्तांनी पहाटेपासूनच रांगा लावून दर्शन घेतले.
4दुपारीनंतर थोडय़ा प्रमाणात ओसरलेली गर्दी मात्र दुपारी चार नंतर वाढली.या चतुर्थी निमित्त गणराया तसेच मंदिरांची आर्कषक फुलांनी सजावट करण्यात आली होती.

 

Web Title: Due to the celebration of Angargi, crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.