सिमेंटच्या रस्त्यांमध्ये दोष
By admin | Published: August 4, 2015 03:29 AM2015-08-04T03:29:53+5:302015-08-04T03:29:53+5:30
कसबा पेठेतील तपकीर गल्ली, मोटे मंगल कार्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची बांधणी सदोष झाल्याचा गंभीर प्रकार अतिरिक्त आयुक्त
दीपक जाधव , पुणे
कसबा पेठेतील तपकीर गल्ली, मोटे मंगल कार्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची बांधणी सदोष झाल्याचा गंभीर प्रकार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केलेल्या
पाहणीमध्ये निष्पन्न झाला आहे. महापालिकेच्या तज्ज्ञ अभियत्यांनी तीन महिन्यांपूर्वीच या रस्त्याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून ते योग्य झाल्याचे प्रमाणित केले होते. अभियत्यांकडून होणाऱ्या रस्त्यांच्या तपासणीवरच यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सिमेंट रस्ते २५ वर्षांपर्यंत टिकतील; त्यामुळे रस्तेबांधणीवर वारंवार खर्च करावा लागणार नाही, असे कारण देऊन महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात सिमेंट रस्तांचे जाळे उभारले जात आहे. वॉर्डस्तरीय निधीतून गल्लीबोळांमध्ये सिमेंट रस्ते उभारण्याची स्पर्धा नगरसेवकांमध्ये सुरू आहे. मात्र, हे सिमेंट रस्ते सदोष पद्धतीने बांधण्यात आल्याने असून, त्यांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात वाहून जाण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे.
कसबा पेठेतील तपकीर गल्लीमध्ये नुकताच बनविण्यात आलेला सिमेंटचा रस्ता उखडण्याचे काम रविवारी सुरू होते. पावसाळ्यामध्ये रस्त्यात खड्डे
घेण्यास किंवा इतर कामे
करण्यास मनाई असताना रस्ता उखडण्यात येत असल्याने
भाजपचे कसबा प्रचार
प्रसिद्धिप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘लोकमत’च्या सिटीझन जर्नालिस्ट कॉलमच्या माध्यमातून हा प्रकार उजेडात आणला. त्यानंतर याची माहिती घेतली. सिमेंट रस्त्यांच्या सदोष बांधणी झाल्याने त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपकीर गल्लीतील सिमेंट रस्त्याबाबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी त्या रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे आढळून आले.
मोटे मंगल कार्यालयानजीकच्या सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ड्रेनेज व पावसाळी चेंबर उभारण्यात आले आहेत. अगोदरच छोट्या असलेल्या या रस्त्यावर ड्रेनेज व पावसाळी चेंबरची दाटी झाल्याने तेथून वाहने चालविणे अवघड बनले आहे. त्यातच तयार केलेले ड्रेनेजचे चेंबर खचू लागले आहेत.
बकोरिया यांनी याची पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने स्वखर्चातून त्याची दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठेकेदाराने रविवारीच तातडीने या कामाला सुरुवात केली आहे.
सिमेंटचा रस्ते टिकाऊपणा सहा महिन्यांत पाण्यात वाहून जाऊ लागल्याने त्यावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.