बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:32 AM2019-03-03T00:32:41+5:302019-03-03T00:32:44+5:30

बँकेची २८ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Due to cheating the bank | बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोठडी

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कोठडी

Next

पुणे : सदनिकेवर कर्ज घेतलेले असताना कर्जाची परतफेड न करता सदनिका परस्पर विकून बँकेची २८ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
समीर सुभाष रामगुडे (वय ४१, रा. शुक्रवार पेठ) असे कोठडीत वाढ करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजू उत्तमचंद भन्साळी (वय ४२), कैलास सोमनाथ कदम, राहुल सतीश कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ५८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. मार्च २०१६ ते २३ जानेवारी २०१९ या कालावधीत बँक आॅफ महाराष्ट्रच्या नारायण पेठ शाखेमध्ये ही घटना घडली.
आरोपींनी धनकवडी येथील गिरिजाशंकर सहकारी गृहरचना संस्थेतील एका सदनिकेच्या खरेदीखत करारनाम्याच्या आधारे नारायण पेठेतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून २२ लाख ९४ हजार ७४० रुपयांचे कर्ज घेतले. या रकमेची परतफेड न करता खरेदीखत करारनामा रद्द करून सदनिका परस्पर दुसऱ्याला विकून कर्जापोटी घेतलेले २२ लाख ९४ हजार ७४० आणि त्यावरील व्याज ५ लाख २८ हजार ३९२ अशी एकूण २८ लाख २० हजार १३२ रुपयांची बँकेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Due to cheating the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.