जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:27+5:302021-04-30T04:13:27+5:30

काटेवाडी : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथे भरणारा जनावरांचा बाजार सध्या बंद झाला आहे. परिणामी बाजार समितीचे ...

Due to the closure of the livestock market, the turnover of lakhs has come to a standstill | जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प

जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प

Next

काटेवाडी : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथे भरणारा जनावरांचा बाजार सध्या बंद झाला आहे. परिणामी बाजार समितीचे उत्पन्नच थांबले आहे. या बाजारात होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. जनावरांची खरेदी विक्रीचे व्यवहार कसे व कोठे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

बारामतीचा जनावरांचा बाजार दर गुरुवारी भरत आहे. पुणे, सोलापूर, सातारा व नगर जिल्ह्यातून हजारो जनावरे येथे विक्रीसाठी येत असतात. यामध्ये लाखोंची उलाढाल होते. त्याचे उत्पन्न बाजार समितीला चांगले मिळते. मात्र, कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. बारामती शहरासह तालुक्यातील आठवडा बाजार बंद झाले आहेत. बारामती कृषी उत्पन समितीच्या वतीने जळोची येथील गुरांचा बाजार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील अर्थ कारणावर मोठा परिणाम शेतकरी वर्गावर होत आहे.

जनावरांच्या बाजारात बैल, गाई, म्हशी, शेळी, मेंढी आदींची खरेदी विक्री होते. परिसरातील व्यापारी हे व्यवहार करून घेतात त्यातून त्यांना कमिशन मिळते त्यांचाही उदरनिर्वाह या बाजार व्यवहारातून चालतो पण बाजार बंद झाल्याने ते ही व्यापारी अडचणीत सापडलेले आहेत. बारामतीसह जिल्ह्यातील कारखाना ऊस तोडणीसाठी कामगार मोठ्या प्रमाणावर येतात. कारखाना परिसरात ऊस वाहतूकीसाठी बैलजोडी खरेदी करतात चार-पाच महिने गाडीने ऊस वाहतूक व्यवसाय करतात. कारखाना बंद झाले की बैल विकून गावाकडे जातात. नुकतेच बारामती, इंदापूर परिसरातील काही कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे या कामगारांना बैल विकायचे आहेत, पण बाजार बंद असल्याने हा प्रश्न त्यांना सतावत आहे, व्यवहार करायचा म्हटला तरी अडचण झाली आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे होणाऱ्या भागातील शेतकरी जनावरे विकण्याचे प्रमाण जास्त होते.

उन्हाळा संपला की पुन्हा पावसाळ्यात जनावरांची खरेदी होती. सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागले आहेत. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे काही शेतकऱ्याना आपली जनावरे विकायचे आहेत पण बाजार बंद आहे त्यामुळे ती विकायचे कुठे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना उभा ठाकला आहे.

——————————————

कोरोना महामारी संकटामुळे गतवर्षीपासून शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. दुधाचा विक्रीचाही प्रश्न निर्माण होत आहे. खाद्य व दुधाचा दर यामध्ये मोठी तफावत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. हा व्यवसाय बंद करावा, असे अनेकांना वाटत आहे .पण गाई-म्हशी विकायच्या म्हटल्या तर बाजार बंद मुळे त्यांना योग्य किंमत येत नाही. त्यामुळे ‘सहन होईना अन सांगता येईना’ अशी शेतकायाची अवस्था झाली आहे .

——————————————

सध्या गाय आणि म्हशीच्या दुधाला योग्य दर मिळत नाही. खाद्य व दर यांचा मेळ बसत नाही. त्यातच लॉकडॉऊनच्या नावाखाली खाद्याचे दर वाढलेले आहेत. दुधाचे दर कमी झाल्याचे या सगळ्या परिस्थितीत व्यवसाय करणे अवघड झाले .परिणामी जनावरे सांभाळणे कठीण बनले आहेत .

नामदेव ठोंबरे पाटील

(दुग्ध व्यावसायिक)

——————————————

बारामती येथे जनावरांचा बाजार भरतो तो दोन तीन जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बाजाराच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते पण सध्या कोरोना महामारी संकटामुळे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे. गतवर्षी कोरोणामुळे अनेक महिने बाजार बंद होता त्याचाही फटका बारामतीला बसला आहे.

अरविंद जगताप

सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती

Web Title: Due to the closure of the livestock market, the turnover of lakhs has come to a standstill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.