ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 12:33 AM2018-11-06T00:33:46+5:302018-11-06T00:34:02+5:30

आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

Due to cloudy weather diseases on crops due to cloudy weather | ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

Next

शेलपिंपळगाव  - आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. हातातोंडाशी आलेले रब्बीचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी पिकांना रासायनिक औषधांचा डोस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
चालू वर्षी खरीप; तसेच रब्बी हंगामात दूषित हवामानाशी दोनहात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे; मात्र अशा विपरीत परिस्थितीने बळीराजाचे शेतीविषयक आर्थिक बजेट पूर्ण कोलमडून शेतकरी चिंतातूर होऊ लागला आहे. रब्बी हंगामातील कांदा पिकावर लागवडीपासून आजपर्यंत दोन ते तीन वेळा रासायनिक औषधांची फवारणी शेतकºयांनी केली आहे. तरीसुद्धा कांद्यावरील रोगराईचे सावट काही केल्या दूर होत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. पर्यायी पिकांवर चौथ्यांदा फवारणीचा फेरा शेतकºयांनी सुरू केला आहे.
खेडच्या पूर्व; तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. विशेषत: या हंगामात कांदा, ज्वारी, मका, फूलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून, या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे; मात्र बहुतांशी सर्वच पिकांना लहरी हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
आगाप कांदा पीक अगदीच लागवडीपासून धोक्यात असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिके खराब होऊन वाढ खुंटली आहे. दमट वातावरणामुळे पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आर्थिक झळ सोसून महागडी रासायनिक औषधांची फवारणी शेतकरी करू लागला आहे.

रब्बी हंगामाच्या दृष्टीने ढगाळ वातावरण नेहमीच धोकादायक असते. थंड वातावरण पिकांच्या; तसेच उत्पादनवाढीच्या दृष्टीने अनुकूल असते. चालू हंगामात ढगाळ वातावरण सारखे-सारखे पसरत असल्याने दमट हवामान होऊन त्याचा पिकांवर विपरीत परिणाम घडून येत असल्याने आर्थिक झळ सहन करून महागडी रासायनिक औषधे पिकांवर मारावी लागत आहे.
- जानकू दौंडकर, शेलपिंपळगाव

प्रतीक्षा थंडीची...

खेड; तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे; मात्र हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वातावरणातील थंडावाच पिकाला पोषक ठरणार आहे.

तोडणीची पिकेही आजारी...
रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवर, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे;परंतु तोडीव पिकांही रोगराईच्या सावटाखाली असल्याने उत्पादनात घट घडून येऊ लागली आहे.

Web Title: Due to cloudy weather diseases on crops due to cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.