बांधकाम मंदीमुळे मुद्रांक शुल्कचा टक्का घटला
By Admin | Published: November 24, 2014 11:49 PM2014-11-24T23:49:06+5:302014-11-24T23:49:06+5:30
(एलबीटी) अधिभार म्हणून लावण्यात आलेल्या 1 टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्कचे पालिकेस मिळणारे उत्पन्न गेल्या सहा महिन्यांत 6क् कोटींनी घटल्याचे समोर आले आहे.
पुणो : बांधकाम क्षेत्रत आलेल्या मंदीमुळे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे उत्पन्न सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांनी घटले असतानाच, आता स्थानिक संस्था करावर (एलबीटी) अधिभार म्हणून लावण्यात आलेल्या 1 टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्कचे पालिकेस मिळणारे उत्पन्न गेल्या सहा महिन्यांत 6क् कोटींनी घटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एलबीटी विभागाचे उत्पन्नही मागील वर्षीच्या तुलनेने चांगलेच घटले असून, पालिकेच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे.
राज्यशासनाने दीड वर्षापूर्वी महापालिका हद्दीत जकात रद्द करून एलबीटी लागू केलेला आहे. मात्र, जकातीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न घटण्याची शक्यता गृहीत धरून तत्कालीन राज्यशासनाने शहरात होणा:या मिळकतींच्या व्यवहारावर 1 टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क लागू केले होते. हे जादा उत्पन्न महापालिकेस राज्यशासनाकडून दिले जाते. मागील वर्षी एप्रिल 2013 ते 2014 या कालावधीत महापालिकेस मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून तब्बल 250 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
मागील दिवाळीत धडाका
4एप्रिल 2013 ते ऑक्टोबर 2014 या पहिल्या सहामाहीत सुमारे 156 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यात एकटय़ा ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने 55 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
पालिका प्रशासन चिंतेत
1या आर्थिक वर्षात बांधकाम क्षेत्रत मंदीचे वातावरण असल्याने एप्रिल 2014 ते ऑक्टोबर 2014 या सहा महिन्यांच्या कालावधीत हे उत्पन्न अवघे 97 कोटी रुपये मिळाले आहे. त्यातील या वर्षी दिवाळी असूनही ऑक्टोबर महिन्यात केवळ 13 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
2परिणामी या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्कातून मागील वर्षी एवढी रक्कम तरी मिळणार का, याबाबत पालिका प्रशासनच चिंतेत आहे.