कुकडी प्रकल्पातील धरणे फुल, धरणक्षेत्रात मोठा पाऊस : सरासरी ९३.८६ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:48 AM2017-10-16T02:48:14+5:302017-10-16T02:48:26+5:30

कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाच धरणांपैकी चार धरणे १०० टक्के भरली आहे. माणिकडोह धरण झाल्यापासून दुसºयांदा भरण्याच्या मार्गावर आहे. हे धरण ८३ टक्के भरले आहे.

 Due to the cucumber plant, full rain in the dam area: an average of 9 3.86 percent water storage | कुकडी प्रकल्पातील धरणे फुल, धरणक्षेत्रात मोठा पाऊस : सरासरी ९३.८६ टक्के पाणीसाठा

कुकडी प्रकल्पातील धरणे फुल, धरणक्षेत्रात मोठा पाऊस : सरासरी ९३.८६ टक्के पाणीसाठा

googlenewsNext

नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाच धरणांपैकी चार धरणे १०० टक्के भरली आहे. माणिकडोह धरण झाल्यापासून दुसºयांदा भरण्याच्या मार्गावर आहे. हे धरण ८३ टक्के भरले आहे. गेल्या काही वर्षांत प्रथमच सर्व धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. सर्व धरणे सरासरी ९३.८६ टक्के भरलेली आहेत, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर व शाखाअभियंता जे. डी. घळगे यांनी दिली.
कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेली जुन्नर आणि आंंबेगाव ताालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. दोन्ही तालुक्यातील धरणे जवळपास भरलेली आहेत. धरणे भरल्याने डिंभे आणि पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी ९ टक्के पाणीसाठा वाढला आहे. सर्व धरणे मिळून २८ हजार ६६१ दलघमी (९३.८६ टक्के) पाणी प्रकल्पात साठले आहे. गेल्या वर्षी आजमितीला २५ हजार ८७८ दलघफूट ८४.७४ टक्के पाणीसाठा होता. येडगाव धरण भरल्याने या धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे तर डिंभे धरणातून ५०० क्युसेक्स वेगाने घोडनदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येडगाव धरणात २८ हजार दलघमी पाणीसाठा आहे. हे धरण १०० आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात १४ मिमी पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून १ हजार ३८५ मि.मी. पाऊस झाला आहे. माणिकडोह धरणात ८ हजार ४४३ दलघमी पाणीसाठा आहे. हे धरण ८३ टक्के भरले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात ७१ मि.मी पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून आजपर्यंत १ हजार २२५ मि.मी पाऊस झाला आहे. हे धरण १९९५ मध्ये भरले होते. त्यानंतर या वर्षी हे धरण भरण्याच्या मार्गावर आहे.

पिंपळगाव जोगा धरणात ३ हजार ७३७ दलघमी पाणीसाठा आहे. धरण ९६ टक्के भरले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात १७ मि.मी. पाऊस झाला आहे तर १ जूनपासून आजपर्यंत १ हजार २०० मि.मी पाऊस झाला आहे. हे धरण भरल्याने या धरणातून २२० क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू होता, तो आज बंद करण्यात आला.

डिंभे धरणात १२ हजार ४९५ दलघमी पाणीसाठा असून हे धरण १०० टक्के भरले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत २५ मि.मी पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून आजपर्यंत १ हजार ४५४ मि.मी पाऊस झाला आहे. हे धरण भरल्याने या धरणातून ५०० क्युसेक्स वेगाने घोडनदीत विसर्ग सुरू आहे.

चिल्हेवाडी धरणात ६९६ दलघमी पाणीसाठा आहे. हे धरण ८० टक्के भरले आहे. या धरणात १ जूनपासून आजपर्यंत १० हजार ३३ मि.मी पाऊस झाला आहे, अशी माहिती नन्नोर व घळगे यांनी दिली.

Web Title:  Due to the cucumber plant, full rain in the dam area: an average of 9 3.86 percent water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण