बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न, वाहतूकप्रश्न मिटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:02 AM2021-06-12T04:02:07+5:302021-06-12T04:02:07+5:30
आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरी पद्धतीने असलेल्या या बंधाऱ्यात १२० सहस्र घनमीटर पाणीसाठा होणार असून, २६ हेक्टर क्षेत्र ...
आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरी पद्धतीने असलेल्या या बंधाऱ्यात १२० सहस्र घनमीटर पाणीसाठा होणार असून, २६ हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. मयूर कन्ट्रक्शनकडून या बंधाऱ्याचे काम सुरू असून नुकतीच या बंधाऱ्यांच्या कामाची पाहणी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, पंचायत समितीचे उपसभापती अनंता दारवटकर यांनी केली. या वेळी कामासंबधी ठेकेदारास सूचना केल्या.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बंधाऱ्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पाणी व वाहतुकीचा प्रश्न आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून मिटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त आहे.
-दिनकर धरपाळे, जिल्हा परिषद सदस्य, पुणे
कोंढावळे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची पाहणी करताना वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे व इतर.