एड्सबाधितांच्या संख्येत घट, आरोग्य विभागाच्या उपाययोजनांचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:44 AM2017-12-02T02:44:52+5:302017-12-02T02:45:08+5:30
एड्स रोगाबाबत समाजात चांगली जनजागृती झालेली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यात यश येऊ लागले आहे. शून्य गाठायचा आहे, हे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
मंचर : एड्स रोगाबाबत समाजात चांगली जनजागृती झालेली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यात यश येऊ लागले आहे. शून्य गाठायचा आहे, हे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मंचर आरोग्य केंद्रात यावर्षी एचआयव्ही रुग्णांची संख्या कमी झालेली दिसते.
एआरटी म्हणजेच अँटी रिट्रो व्हायरल ट्रिटमेंट ही रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करते. अशी केंद्रे सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात म्हणजे जिल्ह्यासाठी फक्त एक असायचे. परंतु सध्या पुणे जिल्ह्यात एकूण ५ एआरटी केंदे्र झाल्याने रुग्णांची विभागणी होऊन एआरटी केंद्राचा भार विभागला गेला आहे. रुग्णाला एएफएमसी रुग्णालय, वायसीएम हॉस्पिटल, बारामती एआरटी केंद्र आणि ससून एआरटी रुग्णालय अशी एकूण ५ केंद्रे पुणे जिल्ह्यात झाली आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात आयसीटीसी केंद्र २००६मध्ये सुरू झाले असले तरी त्या वेळच्या पॉझिटिव्हचा आकडा पाहता २०१७ची आकडेवारी बºयापैकी कमी झालेली आहे. याठिकाणचे समुपदेशक सुहास मानेकर एचआयव्ही जनजागृतीसाठी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये जातात. पोस्टर्स, प्रवचने, चर्चासत्र या माध्यमातून संवाद साधतात. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. एड्सबाधित रुग्णांची माहिती गोपनीय ठेवली जाते. २०१७मध्ये एड्स रुग्णांची संख्या कमी झालेली दिसते. अनेक रुग्ण खासगी लॅबमध्ये रक्त तपासणी तसेच उपचार करून घेतात. त्यामुळे एचआयव्ही बाधितांची आकडेवारी समजून येत नाही. मात्र सध्या जी आकडेवारी दिसते ती पाहता रुग्णसंख्या कमी झाली असून, या रोगाबाबत जनजागृती हे त्यांचे मुख्य कारण आहे.
१मंचर उपजिल्हा रुग्णालयात सन २००६पासून एचआयव्ही चाचणी केंद्र सुरू झाले. या ठिकाणी मोफत सल्ला व एचआयव्ही चाचणी केली जाते.
2खादा रुग्ण एचआयव्ही बाधित आढळला तर त्याचे समुपदेशन करून त्याला जवळच्या वायसीएम हॉस्पिटल या ठिकाणी एआरटी केंद्राला संलग्न केले जाते.
3त्या ठिकाणी बाधित व्यक्तीची चाचणी करून तत्काळ उपचार सुरू केले जातात. मंचर उपजिल्हा रुग्णालयात ल्ािंक एआरटी केंद्र सन २००८मध्ये स्थापन झाले आहे.
४या ठिकाणी ३०० व्यक्ती औषधोपचार घेत आहेत, हे केंद्र वायसीएम हॉस्पिटलशी संलग्न असल्यामुळे तेथून मंचर हॉस्पिटलला रुग्णांना औषधोपचारासाठी पाठविले जाते.