मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे युतीचा पश्चिम विभागीय मेळावा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:26 AM2019-03-18T03:26:39+5:302019-03-18T03:26:57+5:30

भारतीय जनता पक्ष व काँग्रेसच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर होत नसल्याने पुढील २ ते ३ दिवसांत ती जाहीर होण्याची शक्यता नाही़ गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने सोमवारी पुण्यात होणारा पश्चिम विभागीय मेळावा रद्द केला़

Due to the demise of Manohar Parrikar, the alliance's western divisional rally will be canceled | मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे युतीचा पश्चिम विभागीय मेळावा रद्द

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे युतीचा पश्चिम विभागीय मेळावा रद्द

googlenewsNext

पुणे : भारतीय जनता पक्ष व काँग्रेसच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर होत नसल्याने पुढील २ ते ३ दिवसांत ती जाहीर होण्याची शक्यता नाही़ गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने सोमवारी पुण्यात होणारा पश्चिम विभागीय मेळावा रद्द केला़
भाजपा व शिवसेनेचा पश्चिम विभागीय मेळावा सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार होता़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार होते़ गेले दोन दिवस सर्व कार्यकर्ते व नेते या मेळाव्याच्या तयारीत होते़ मात्र, रविवारी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले़ त्यामुळे सोमवारी होणारा मेळावा रद्द केला आहे़ पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या तीनही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत़ काँग्रेसच्या पुण्यातील उमेदवार कोण असणार, याविषयी अजूनही निश्चित काही नसल्याचे सांगितले जात आहे़ उमेदवारीसाठी दिल्लीला गेलेले काँग्रेसचे इच्छुकही इतक्या उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता नसल्याने पुण्यात परतले आहेत़ काँगे्रसची केंद्रीय निवड समिती सध्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या जागांचे उमेदवार निश्चित करण्याच्या प्रयत्नात आहेत़ हीच काहीशी परिस्थिती भाजपाची आहे़ त्यामुळे दोन्ही पक्षाच्या केंद्रीय निवड समितीकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवार निश्चित केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याने अजून २ ते ३ दिवस पुण्यातील उमेदवारांचे नाव जाहीर होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे़
उमेदवारांची नावे निश्चित नसल्याने काँग्रेस भवनात अजून कार्यकर्त्यांची चहलपहल दिसून येत नाही़ अशीच काहीशी परिस्थिती भाजपाच्या कार्यालयात आहे़ उमेदवारांची घोषणा झाल्यानंतरच खºया अर्थाने निवडणुकीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे़

Web Title: Due to the demise of Manohar Parrikar, the alliance's western divisional rally will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.