पाऊस गायब झाल्याने भीमा नदी कोरडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 01:32 AM2018-09-23T01:32:04+5:302018-09-23T01:32:21+5:30
पाऊसच गायब झाल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी भीमा नदी कोरडी पडू लागली आहे. चास धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दावडी : पाऊसच गायब झाल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी भीमा नदी कोरडी पडू लागली आहे. चास धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरात यंदा पावसाळा संपत आला तरी पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे विहिरी पूर्ण क्षमतेने भरल्या नाहीत. चासकमान धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. चासकमान धरणाचा डाव्या कालवा तुडुंब भरुन वाहतोय. मात्र या पाण्याचा उपयोग नदीकाठच्याा शेतकºयांना होत नाही. सध्या या परिसरात कांदा लागवडीला वेग आहे.
सिद्धेश्वर मंदिरापाठीमागील बंधाºयाला ढापे टाकण्यात आले आहेत. मात्र, थोडे-थोडे पाणी येत असल्याने हा बंधारा कधी भरणार व पुढे पाणीच येत नसल्याने होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव दावडी या परिसरातून जाणारे नदीपात्र कोरडे पडले आहे. चासकमान धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडावे, म्हणजे सिद्धेश्वर मंदिरापाठीमागील बंधारा लवकर भरून पुढे पाणी येईल. तसेच कांदा लागवड व इतर पिकांना पाणी देता येईल
असे सांगितले.