रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जिल्ह्यात वाढले अपघातांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:20 AM2019-02-28T02:20:22+5:302019-02-28T02:20:25+5:30

सासवडमध्ये एक ठार : पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने उलटली

Due to the diseases of roads, the number of accidents increased in the district | रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जिल्ह्यात वाढले अपघातांचे प्रमाण

रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जिल्ह्यात वाढले अपघातांचे प्रमाण

Next

सासवड : सासवड-जेजुरी रोडवरील वीर फाट्यावर २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान झालेल्या अपघातात परिंचे येथील तरुण स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. सोमनाथ मारुती दुधाळ हा त्याचा चुलतभाऊ गंभीर जखमी झाला आहे. याची फिर्याद लहू महादेव दुधाळ (रा. परिंचे) यांनी सासवड पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.


सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील वीर फाटा येथे ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. त्याचा चुलत भाऊ सोमनाथ मारुती दुधाळ (वय ४२) हा गंभीर जखमी झाला आहे .दोघेही परींचे तालुका पुरंदर येथील रहिवाशी असून सासवड येथील एका पेट्रोल पंपावर कामाला होते. त्यांची कामावरील सुट्टी झाल्यानंतर मोटरसायकल (नंबरएम एच. १२-एनएच ९४९८) वरून दोघेही घरी निघाले असताना वीर फाटा येथे माल ट्रक (एमएच 0४-जीआर-३५४१)ने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.

कळंब व एकलहरे हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने वेगवेगळ्या ठिकाणी उलटली आहेत. अपघातात जीवितहानी झाली नाही.
याबाबत माहिती पुढीलप्रमाणे घोडनदीवरील पुलाच्या पुढील बाजूस सकाळी साडेसहा वाजता आर. आर. रोडवेज प्रा. लि., कंपनीची मालवाहतूक गाडी उलटली. मुंबई येथील कंपनीतून टाटा मोटर्स कंपनीला पुण्याला माल घेऊन जाणारा कंटेनर (एमएच ४६ एच ३३५०) पुढील वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु चालक मानकू यादव जखमी झाला असून मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.


ही घटना घडल्यानंतर त्याने दुसरा सहकारी मकसूद आलम याला फोनवरून गाडी उलटल्याची माहिती देत असतानाच त्याची गाडी उलटली.
चौधरी ढाब्याजवळ कंटेनर (एमएच ४६ एआर ७५८०) उलटला. या दोन घटनांमध्ये एक किलोमीटरचे अंतर असल्याचे दिसून आले. यामध्ये चालक मकसूद आलम यालासुद्धा किरकोळ दुखापत झाली असून याच्याबरोबर असणारे सहकारी सलमान अन्सारी व काबीलमियाँ हेसुद्धा जखमी झाले आहेत.
जिल्ह्यातील पुणे-नाशिक तसेच पुणे-सातारा , पुणे-सोलापूर, पुणे-नगर या मार्गांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: Due to the diseases of roads, the number of accidents increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.