शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:35 AM2018-12-26T00:35:49+5:302018-12-26T00:36:06+5:30

आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 Due to the famine in the eastern part of Shirur, the farmers in the area were distressed | शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढली, परिसरातील शेतकरी त्रस्त

Next

रांजणगाव सांडस : आलेगाव पागा शिरूर येथे व परिसरात दुष्काळाची दाहकता वाढल्याने पाण्याची तीव्रतेने कमतरता जाणवत आहे. यामुळे येथील शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना लवकरात लवकर पाण्याची सोय करून देण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.

येथील तांबेवस्ती, रांजणगाव सांडस परिसरातील कामठेवाडी, शिंदेवस्ती, पठार भाग आंधळगाव, न्हनावरे, उरळगाव, कोळपेवस्ती त्याचप्रमाणे नागरगावचा काही भाग या भागांमध्ये दुष्काळाची दाहकता खूप वाढलेले भागात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

आलेगाव पागामध्ये पाणी साठवण्याची शेंडगेवाडी तलाव तांबेवस्ती तलाव तीन वर्षांपूर्वी आटल्यामुळे या भागात जनावरांच्या व शेतीच्या पिण्याचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात दिवसाकाठी दहा ते बारा बोअरवेल घेऊन पूर्णपणे बोअरवेलचा धुरळा निघालेला असून हिवाळ्यात पिकांचा उन्हाळा झालेला आहे. शेतातील पिके दिवाळीनंतरच संपलेली असून या भागात पिके पाहायला मिळत नाही.

एका बोरवेल साठी साधारणपणे दोनशे ते तीनशे फुटापर्यंत पंचवीस ते सव्वीस हजार रुपये खर्च येत आहे 70 रुपये ते 65 रुपये फूट या दराप्रमाणे बोरवेल मशीन चे एजेंट शेतकरी वर्गाकडून पैसे उकळत असल्याची वस्तुस्थिती आहे साधारणपणे पै पाहुण्याकडून पैसे गोळा करून शेतकरी आपल्या शेतामध्ये बोरवेल घेत आहे परंतु पाणी न लागल्यामुळे शेतक?्यांच्या डोक्?यावर कजार्चा डोंगर अजूनही मोठा होता आधीच पिके जळून गेल्याने सोसायटी कर्ज व इतर कडून घेतलेले पैसे यांचाही डोंगर वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला असून या भागामध्ये चासकमानचे आवर्तन लोकप्रतिनिधींनी सोडले तर या भागात दुष्काळाची दाहकता कमी होऊ शकते.

आलेगाव पागा परिसरात दिवसाकाठी एक-दोन बोअरवेल होत असून या बोअरवेल पूर्णपणे रिकामा जात आहे. पाण्याची पातळी खालावलेली असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. या भागामध्ये तसेच शिरूरच्या पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये बोअरवेल मशीन पाणी पाहणारा पाणाड्या शेतकरी आणि धुरळा हे समीकरणच जणू जुळलेले दिसत आहे. पाणी लागत नाही व शेतकरी बोअर घेतल्याशिवाय राहत नाही. बोअर केल्यानंतर शेतकºयाला वीस ते पंचवीस हजार रुपयांचा या दुष्काळाच्या परिस्थितीतही कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. शिरूरच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता मोठी असून लोकप्रतिनिधींनी पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, ही नागरिकांची मागणी आहे.

उरळगाव ,नावरे कोळपे वस्ती या परिसरात चासकमान च्या पाण्याचे आवर्तन येऊन गेल्यामुळे विहिरी बोरवेल यांच्या पाण्यासाठी थोडीशी वाढ झालेले आहे परंतु जानेवारीनंतर या भागात टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते
- अशोक कोळपे, युवा शेतकरी

Web Title:  Due to the famine in the eastern part of Shirur, the farmers in the area were distressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.