खतांमुळे पिण्याचे पाणी होतेय अशुद्ध

By admin | Published: April 14, 2015 11:30 PM2015-04-14T23:30:32+5:302015-04-14T23:30:32+5:30

दिवसेंदिवस शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढत असून, याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत आहे.

Due to fertilization, drinking water is unclean | खतांमुळे पिण्याचे पाणी होतेय अशुद्ध

खतांमुळे पिण्याचे पाणी होतेय अशुद्ध

Next

बापू बैलकर ल्ल पुणे
दिवसेंदिवस शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढत असून, याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या रासायनिक पाणी सर्वेक्षणात १ हजार १00 ठिकाणच्या
पाण्यात नायट्रेटचे प्रमाण आढळले असून, यातील ३६५ ठिकाणचे पाणी पिण्यास धोकादायक असल्याचे आढळून आले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या
शेतात रासायनिक खतांचा वापर करताना त्याचे प्रमाण किती वापरावे याचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे.
शेतात सोडलेले युरियामिश्रित पाणी मेंढ्या व शेळ्यांनी प्याल्याने हिवरे तर्फे नारायणगाव येथे ७
एप्रिल रोजी १२ मेंढ्या तर १० शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
जिल्हा परिषदेने १ सप्टेंबर ते १५ फेबु्रवारीदरम्यान केलेल्या पाण्याच्या रासायनिक सर्वेक्षणात, जिल्ह्यात ८ हजार ४७ ठिकाणचे पाणी
नमुने राज्य प्रयोगशाळेने नुकतेच तपासले आहेत. त्यात २ हजार ४४४ ठिकाणच्या पाण्यात नायट्रेट, फ्लोराईड, आयर्न, टीडीएस, अल्कालिनीटी, टर्बिडीटी, क्लोराईड व जडत्व आढळले आहे.
मात्र यात नायट्रेटचे ४५ मिलिग्रॅम पर लिटरपेक्षा जास्त प्रमाण
असलेले ३६५ पाणीस्रोत, टीडीएसचे ५00 ते २ हजार मिलिग्रॅम
पर लिटरपेक्षा जास्त प्रमाण असलेले ९२ पाणीस्रोत तर फ्लोराईडचे १ ते १.५ मिलिग्रॅम पर लिटरपेक्षा जास्त
प्रमाण असलेला १ पाणीस्रोत आढळून आला आहे.

९२ ठिकाणी क्षारयुक्त पाणी
४जिल्ह्यात क्षारयुक्त पाणी २0४ ठिकाणी आढळले आहे. मात्र त्यात ५00 ते २ हजार मिलीग्रॅम परलिटर पेक्षा जास्त प्रमाण असलेले ९२ पाणीस्त्रोत आहेत. म्हणजे येथील
पाणी पिण्यास अयोग्य आहे.

१६४ ठिकाणचे पाणी गढूळ
४पावसाळा नसतानाही जिल्ह्यात १६४ ठिकाणचे पाणी गढूळ असल्याचे दिसून आले. यात सर्वाधिक बारामतीत ६४, दौंडला ३0, इंदापूरला १९, हवेलीत १५, मावळमध्ये १0 आणि भोरला ६ ठिकाणचे पाणी गढून आहे.

जिल्ह्यात ४४९ ठिकाणचे पाणी तीव्र जोखीम असल्याचे तपासणीत समोर आले आहे. ज्या एका गावात फ्लोराईड आढळून आले आहे, तेथील पाण्याची पुनर्तपासणी करावी, अशी सूचना दिल्या आहेत.
- कांतिलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

पश्चिम महाराष्ट्रात शेतीसाठी रासायनिक खताचा जास्त वाफर होतो. त्यामुळे शेतातील हे रसायनमिश्रित पाणी गावाचे पाणीस्त्रोत असलेल्या विहीरींत मिसळले जात असल्याने अलिकडे पिण्याच्या पाण्यात नायट्रेट जास्त आढळत आहे. तसेच गावांमध्ये सांडपाण्याचे प्रमाणही वाढले असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. ते पाणीही पिण्याच्या पाण्यात मिसळले जाते.
- बी. के सवाई, संचालक पाणी व स्वच्छता
साहाय्य संस्था, महाराष्ट्र राज्य

एकाही ग्रमापंचायतील लाल कार्ड नाही
आॅक्टोबर २0१४ मध्ये केलेल्या सर्र्व्हेेक्षणात ९ हजार ३७१ ठिकाणच्या पाणीस्त्रोतांचे सर्व्हेक्षण करण्यात आले . यात १0८ ठिकाणचे पाणीस्त्रोत तीव्र जोखीम असलेले आढळून आले होते. जिल्ह्यात फक्त राजगुरूनगर ग्रामपंचायतीला रेड कार्ड मिळाले होते. मात्र तीही नगरपरिषद झाल्याने आता एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड मिळाले नाही. पिवळे कार्ड २0७ ग्रामपंचायतींना तर १ हजार १९६ ग्रमापंचायतीनां हिरवे कार्ड मिळाले होते. ज्या गावात ७0 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या त्या स्त्रोतावर अवलंबून आहे. त्या ठिकाणी तीव्र व मध्यम जोखीम असल्यास त्या ग्रमापंचयातीला लाल कार्ड दिले जाते.

पावसाळापूर्व सर्वेक्षण
४जिल्ह्यात पावसाळापूर्व म्हणजेच १ एप्रिल ते ३0 एप्रिल व पावसाळ््यानंतर १ आॅक्टोबर ते ३0 आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता सर्व्हेक्षण केले जाते. आता पावसाळापूर्व सर्व्हेक्षण जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी जलसुरक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, विस्तार अधिकारी, यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

१९ ठिकाणची ब्लिचिंग पावडर वापरास अयोग्य
४मार्चमध्ये जिल्ह्यात ३७२ ठिकाणच्या तपासलेल्या ब्लिीचिंग पावडर नमुन्यात १९ ठिकाणच्या पावडरमध्ये २0 टक्केपेक्षा कमी क्लोरीन आढळले आहे. भोर तालुक्यात सर्वाधिक ७ ठिकाणचा समावेश असून त्यानंतर जुन्नरला ३, आंबेगाव, बारामती, दौंड २ तर हवेली, इंदापूर व शिरूरला १ ठिकाणची पावडर वापरास अयोग्य आहे.

Web Title: Due to fertilization, drinking water is unclean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.