अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळी टळली हाेर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 08:53 PM2018-10-25T20:53:28+5:302018-10-25T20:59:20+5:30

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जुना बाजार हाेर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली अाहे.

due to fire brigade quick response duplication of hording accident is not happen | अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळी टळली हाेर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळी टळली हाेर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती

Next

पुणे :  तीन अाठवड्यांपूर्वी पुण्यातील जुना बाजार जवळ असलेल्या चाैकातील धाेकादायक हाेर्डिंग काेसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अशीच घटना अश्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळली अाहे. पुणे स्टेशन येथील एसटी स्टॅण्डच्या हद्दीत असणारे दाेन हाेर्डिंग पडण्याच्या स्थितीत हाेते. पाेलिसांनी याबाबत अग्निशमन दलाशी संपर्क केल्याने अग्निशमन दलाने महापालिकेच्या अाकाशचिन्ह विभागाच्या मदतीने धाेकादायक हाेर्डिंग हटविण्यात अाले अाहेत. 

    पुणे स्टेशनजवळील एसटी स्टॅंण्डच्या प्रवेशद्वाराजवळ दाेन हाेर्डिंग तुटलेल्या अवस्थेत घाेकादायक रित्या उभे हाेते. पाेलिसांनी याबाबत अग्निशमन दलाशी संपर्क केला. दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल हाेत दाेन्ही धाेकादायक हाेर्डिंग हटविण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या अाकाशचिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना या कामात मदत केली. दुपारी 3.30 च्या सुमारास दाेन्ही धाेकादायक हाेर्डिंग सुरक्षितरित्या हटविण्यात अाले. त्यामुळे जुना बाजार येथील हाेर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. 

   

याविषयी माहिती देताना दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्राचे स्टेशन ड्युटी अाॅफिसर विजय भिलारे म्हणाले, पाेलिसांनी पुणे स्टेशन जवळील एसटी स्टॅण्डच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या धाेकादायक हाेर्डिंग्जची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पाहिले असता हाेर्डिंग हे जुने असल्याचे तसेच त्याच्या पाया असणारा खांब तुटल्याचे निदर्शनास अाले. तर इतर खांब गंजलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र हाेते. हवेमुळे हाेर्गिंड हालत हाेते. त्यामुळे हाेर्डिंग पडून एखादा अपघात हाेण्याची शक्यता हाेती. महापालिकेच्या अाकाशचिन्ह विभागाच्या मदतीने धाेकादायक हाेर्डिंग्ज अाम्ही हटवले अाहेत. 

Web Title: due to fire brigade quick response duplication of hording accident is not happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.