गणेशोत्सवामुळे फुलांची आवक दुप्पट, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:45+5:302021-09-10T04:14:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बुधवार आणि गुरुवारी फुलांची दुप्पट आवक झाली. झेंडू, गुलाब, ॲस्टर, शेवंती ...

Due to Ganeshotsav, the arrival of flowers has doubled and the rates have come down | गणेशोत्सवामुळे फुलांची आवक दुप्पट, दर घसरले

गणेशोत्सवामुळे फुलांची आवक दुप्पट, दर घसरले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बुधवार आणि गुरुवारी फुलांची दुप्पट आवक झाली. झेंडू, गुलाब, ॲस्टर, शेवंती आणि गुलछडीच्या फुलांना चांगली मागणी आहे. मागील वर्षी गणेशोत्सवात झेंडू १०० रुपये किलो होता. यंदा मात्र, २० ते ४० रुपये किलोला भाव मिळत आहे. तर शेवंतीला मागणी चांगली असून दरही स्थिर आहेत. फुलांमध्ये फक्त गुलछडीला चांगला बाजारभाव मिळत आहे. २०० ते ४०० रुपयांवर ३०० ते ६०० रुपये प्रतिकिलोला भाव मिळत आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच कल्याण, ठाणे आणि पनवेल परिसरातून मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी नेहमी असते. गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेला पावसामुळे फुलांची आवक फारच कमी प्रमाणात झाली. मात्र, बुधवार आणि गुरुवारी फुलांची आवक दुप्पट-तिप्पटीने वाढली आहे. गणेशोत्सवामुळे मागणीही चांगल्या प्रमाणात आहे. मात्र, त्या तुलनेत बाजारभाव खूपच पडलेले आहेत.

-----

फुलांचे बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो)

वाण आवक किमान कमाल सरासरी

* मोगरा २४ (किलो) ४०० ५०० ४५०

* कागडा ८६८ (किलो) ३०० ४०० ३५०

* जुई ७९ (किलो) ५०० ६०० ५५०

* गुलछडी ५४७२ (किलो) २०० ३०० २५०

* झेंडू ४६२४१ (किलो) २० ४० ३०

* तुळजापुरी झेंडू ५०६५ (किलो) २० ३० २५

* बिजली ६८४२ (किलो) ४० ६० ५०

* शेवंती पांढरी २३५९२ (किलो) ४० ७० ५३

* शेवंती पिवळी २५१६ (किलो) ४० ७० ५४

* ॲस्टर ५५४४ (किलो) ०८ १२ १०

* लिलि ९६७ (गड्डी) ३० ५० ४०

* गुलाब साधा १००६६ (गड्डी) २० ३० २५

* गुलाब ग्लॅडिएटर १३२२ (गड्डी) ३० ६० ४४

* गुलछडी काडी १९५ (काडी) १० ३० २०

* ॲस्टर ढाकळी १५३८ (गड्डी) १० ३० २०

* गोल्डन रेड/डेझी २४५६ (गड्डी) १० २० १७

* ग्लॅडिओलस साधा ८०५ (गड्डी) १० ३० २०

* ग्लॅडिओलस कलर ४३८० (गड्डी) २० ४० ३०

* जिप्सी ४७५ (गड्डी) ८० १२० १००

* कोंबडा ६६५ (गडडी) १० २० १५

* जरबेरा ९९१६ (गड्डी) ३० ५० ४०

* कार्नेशन ४९० (गड्डी) ८० १४० ११८

* डचगुलाब ९७८२ (गड्डी) ८० १२० १००

* अबोली १३ (किलो) ५० ३०० २१९

* चाफा ६७१८० (नगास) ०१ ०२ ०१

* जास्वंदी ४२०० (नगास) ०१ ०२ ०१

* लिलियम ४० (गड्डी) ५०० ६०० ५५०

* ऑर्किड ५१३ (गड्डी) ३०० ४०० ३५०

* शेवंती काडी १९५ (गड्डी) १०० २०० १५९

Web Title: Due to Ganeshotsav, the arrival of flowers has doubled and the rates have come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.