तुषारच्या गोलमुळे आलेगावकर संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 02:05 AM2018-08-30T02:05:12+5:302018-08-30T02:05:35+5:30

शालेय हॉकी स्पर्धा : सेंट जोसेफ बॉईज १४ वर्षांखालील गटात अजिंक्य

Due to the goal of Tusshar, the winner of the Aggaonkar Sangh | तुषारच्या गोलमुळे आलेगावकर संघ विजेता

तुषारच्या गोलमुळे आलेगावकर संघ विजेता

googlenewsNext

पुणे : तुषार गायकवाडने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर आलेगावकर हायस्कूल संघाने आंतरशालेय १७ वर्षांखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेत सेंट जोसफ, खडकी संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून विजेतेपद जिंकले. दुसरीकडे १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ बॉईज स्कूल संघाने मॉडर्न हायस्कूल संघाला नमवित विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला.

जिल्हा क्रीडा परिषद व शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील वरील अंतिम सामन्यात आलेगावकर हायस्कूल संघाने सेंट जोसेफ, खडकी संघाचा १-० गोलने पराभव केला. सुरुवातीपासून आलेगावकर संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच जदल व आक्रमक खेळ करीत वर्चस्व राखले. आलेगावकर संघाच्या तुषार गायकवाडला त्याचा सहकारी विनायक बिरंजेकडून १८ मिनिटाला मिळालेल्या पासचा पूर्ण फायदा घेत आपल्या संघाचा एकमेव केला.
तत्पूर्वी, उपांत्यफेरीतच्या पहिल्या सामन्यात आलेगावकर हायस्कूल संघाने सेंट पेट्रिक्स हायस्कूल संघाचा ७-० तर सेंट जोसेफ, खडकी संघाने विद्याभवन हायस्कूल संघाचा १-० गोलने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तृतीय क्रमांकाच्या लढतीत विद्याभवन संघाने सेंट पेट्रिक्स संघाला १-० गोलने नमविले. विजयी संघाकडून अनिरुद्ध भोसलेने एकमेव गोल केला.

दुसरीकडे १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ बाईज स्कूल संघाने मॉडर्न हायस्कूल संघाचा ३-० गोलने पराभव करीत जेतेपद जिंकले. विजयी संघाकडून शिवम पाटीलने ७ व १९ व्या मिनिटाला असे दोन, केदार चव्हाणने २३ व्या मिनिटाला एक गोल केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत सेंट जोसेफ बॉईज स्कूल संघाने डॉ. झाकिर हुसेन स्कूल संघाला १-० तर मॉडर्न संघाने सेंट पेट्रिक्स संघाला २-० गोलने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या वयोगटात तृतीय क्रमांकाच्या सामन्यात सेंट पेट्रिक संघाने डॉ. झाकिर हुसेन स्कूल संघाला ३-१ गोलने नमविले. विजयी संघाकडून १० व्या मि. आशिष गायकवाड, १८ व्या मि. प्रेम चांदने व २० व्या मि. हृषीकेश जाधवने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून २३ व्या मि. केदार चव्हाणने एक गोल केला.

Web Title: Due to the goal of Tusshar, the winner of the Aggaonkar Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे