पावसाच्या मोठा खंड पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:33+5:302021-07-05T04:08:33+5:30

(स्टार ८८२ डमी) पुणे : जिल्ह्यात ६ जून ते १७ जून या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. तसेच त्यांनतरही ...

Due to heavy rainfall, only 31% sowing has been done in the district so far | पावसाच्या मोठा खंड पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पेरणी

पावसाच्या मोठा खंड पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पेरणी

Next

(स्टार ८८२ डमी)

पुणे : जिल्ह्यात ६ जून ते १७ जून या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. तसेच त्यांनतरही पावसाचे प्रमाण अपेक्षापेक्षा कमी राहिले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३१.२३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात दमदार पावसाची अपेक्षा आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले.

हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात वेळेवर पावसाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, जूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पावसाने मोठी ओढ दिली. चौथ्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, त्यातही दोन दिवस पाऊस तर त्यानंतर दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे ३१.२३ टक्के क्षेत्रावर केलेली पेरणीही अडचणीत आली आहे. येत्या आठवड्याभरात दमदार पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.

----

पॉईंटर्स

जिल्ह्यातील सध्याची स्थिती

* जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस :- १८७ मिलिमीटर पाऊस

* जिल्ह्यात आतापर्यंत झालेली पेरणी :- ५७५५७.१८ हेक्टर

-----

सोयाबीनचा पेरा वाढला

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पेरणीत बाजरीचा पेरा चांगला आहे. १३ हजार ७०९ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. तर सर्वाधिक सोयाबीनचा पेरा झाला आहे. तब्बल २० हजार ३९४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

----

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

१) यंदा जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. बाजरी, मुगाची पेरणी केली आहे. मात्र, पेरणीनंतर दोन आठवडे पावसाने ओढ दिली. त्यामुळे आता आमच्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.

- नामदेव पऱ्हाड, शेतकरी

----

२) दरवर्षी पाऊस ओढ देत आहे. मागच्या वर्षीही दुबार पेरणी करावी लागली होती. यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे हे आता नित्याचेच झाले आहे. येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

- दिनकर टुले, शेतकरी

-----

... तर दुबार पेरणी

जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण पावसाचा खंड पडल्याने अद्याप उगवले नाही. येत्या आठ-दहा दिवसांत पाऊस जर पडला नाही, तर दुबार पेरणी करावी लागणार आहे.

-----

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, जून महिन्यात जवळजवळ १५ दिवस पावसाचा खंड होता. त्यामुळे अनेक तालुक्यांतील पेरण्या खोळंबल्या आहेत.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक

-----

जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस (मि.मी), तर पेरणी (हेक्टरमध्ये)

तालुका पाऊस पेरणी

भोर २७२ ८३०५

वेल्हा ४६४ ४५६

मुळशी ३१६ ३६८.४

मावळ ३४१ ३६६

हवेली १५३ १३३८

खेड १८४ १०८०७.१

आंबेगाव २०८ ४६४३

जुन्नर १२८ ७८६४

शिरूर ११७ ६५२६

पुरंदर ११७ १०११५.८८

दौंड १३३ २११४

बारामती १०४ ३४२४

इंदापूर १०९ १२२९

एकूण १८७ ३१.२३

Web Title: Due to heavy rainfall, only 31% sowing has been done in the district so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.