पावसाच्या ओढीमुळे मुळशी तालुक्यामध्ये भातलागवड लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:52+5:302021-07-08T04:08:52+5:30

मुळशी तालुक्यामध्ये भात हे शेतीचे मुख्य पीक आहे, तर यामध्ये इंद्रायणी वानाचे पीक हे जास्त घेतले जाते. महत्त्वाचे म्हणजे ...

Due to heavy rains, paddy cultivation in Mulshi taluka was delayed | पावसाच्या ओढीमुळे मुळशी तालुक्यामध्ये भातलागवड लांबली

पावसाच्या ओढीमुळे मुळशी तालुक्यामध्ये भातलागवड लांबली

googlenewsNext

मुळशी तालुक्यामध्ये भात हे शेतीचे मुख्य पीक आहे, तर यामध्ये इंद्रायणी वानाचे पीक हे जास्त घेतले जाते. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यामध्ये चारसूत्री पद्धतीने भातलागवड केली जाते.

यावर्षी पावसाने जून महिन्यामध्येच दमदार हजेरी लावली असताना सर्वत्र समाधानाचे व आनंदाचे वातावरण होते. परंतु, सद्य परिस्थितीमध्ये याच पावसाने ओढ दिल्याने मुळशी करांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा यावर पर्याय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, तलाव व नदीच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यांमध्ये भातलागवड तुरळक सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

फोटो ओळ : पद्मावती विकास सोसायटीचे संस्थापक लहू सुतार यांच्या शेतात सुरू असलेली भात लावणी.

Web Title: Due to heavy rains, paddy cultivation in Mulshi taluka was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.