अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 05:05 PM2019-08-04T17:05:49+5:302019-08-04T17:05:58+5:30
पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.5) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे: पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.5) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
पुणे जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच आपत्कालीन परिस्थितीमुळे त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे.
Heavy rainfall is expected in Pune, PCMC and other areas in the district. Considering this, civic authorities might declare a holiday for schools and colleges. NDRF team has also been deployed in Kamshet. Image: IMD pic.twitter.com/KKYg475OIq
— Pune City Life (@PuneCityLife) August 4, 2019
तसेच जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हा आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये शनिवार पासून अतिवृष्टी सुरू झालेली आहे. त्यातच मुंबई हवामान विभागाने येत्या सहा ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्र व गोवा राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.