सुपे शाळेतील विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा
By admin | Published: February 4, 2016 01:33 AM2016-02-04T01:33:21+5:302016-02-04T01:33:21+5:30
येथील इयत्ता ५ वी मध्ये शिकणााऱ्या विद्यार्थ्याने रस्त्यावर सापडलेली ७३ हजार रुपयांची पिशवी परत केली.
सुपे : सुपे (ता. बारामती) येथील इयत्ता ५ वी मध्ये शिकणााऱ्या विद्यार्थ्याने रस्त्यावर सापडलेली ७३ हजार रुपयांची पिशवी परत केली. त्याने छोट्याशा वयात दाखवलेल्या प्रामणिकपणामुळे श्री शहाजी विद्यालयात सार्थक नेवसे याचा सत्कार करण्यात आला.
त्यामुळे नेवसे यांनी राजहंस पतसंस्थाचे एजंट संजय ढम यांना याबाबत सांगितले. यावेळी ढम यांनी ती पिशवी माझीच पडल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना ती पिशवी परत करण्यात आली. सार्थक याने दाखविलेल्या प्रामणिकपणामुळे विद्यालयात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक जी. जे. गजभारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी येथील सरपंच दादा पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास धेंडे, संतोष लोणकर, इक्बाल मुलाणी, सुदाम नेवसे, प्राचार्य डी. एस. माने, पर्यवेक्षक व्ही. एस. शितोळे, अशोक लोणकर, राजहंस पतसंस्थेचे शाखाधिकारी संभाजी शेंडकर, हभप संजय ढम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)