अपक्षांच्या आशा संपुष्टात

By admin | Published: January 11, 2017 03:49 AM2017-01-11T03:49:38+5:302017-01-11T03:49:38+5:30

सदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक फटका अपक्षांना बसला आहे, एकट्याच्या बळावर चारच्या प्रभागातून निवडून येणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे

Due to the hope of independents | अपक्षांच्या आशा संपुष्टात

अपक्षांच्या आशा संपुष्टात

Next

पुणे : चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक फटका अपक्षांना बसला आहे, एकट्याच्या बळावर चारच्या प्रभागातून निवडून येणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याऐवजी कोणत्या तरी पक्षाचा आधार घेऊन निवडणुका लढविण्यावर भर दिला जात आहे.
महापालिकेची निवडणूक वॉर्डपद्धतीने पार पडत होती, त्या वेळी संबंधित भागामध्ये चांगली छाप असलेल्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली जात होती. स्वत:ची स्वतंत्र सुभेदारी निर्माण करण्यावर त्यांच्याकडून भर दिला जायचा. पालिकेमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळता त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास अपक्षांचा भाव भलताच वधारत असे. त्या जोरावर ती पालिकेतील महत्त्वाची पदे मिळविण्याचा प्रयत्न करीत.
मागील वेळेस २ सदस्यीय प्रभाग पद्धतीने पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्या वेळी अश्विनी कदम या एकमेव नगरसेविका अपक्ष म्हणून निवडून येऊ शकल्या. यंदाचा दोनचा प्रभाग दुप्पट करून चार सदस्यीय बनविण्यात आला आहे. त्यामुळे
मिनी विधानसभेचे मतदारसंघ तयार झाले आहेत. त्यामुळे ज्याची आमदार बनण्याची क्षमता आहे, तोच
अपक्ष म्हणून नगरसेवक बनू शकणार आहे. (प्रतिनिधी)

पैसे लाटण्यासाठीही काही जण राहतात उभे
अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायचा. त्यानंतर संबंधिताने अर्ज मागे घ्यावा यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून गळ घातली जाते. तेव्हा त्या उमेदवारांकडून थोडेफार पैसे घेऊन माघार घ्यायची असे प्रकारही काही अपक्ष उमेदवारांकडून केले जात असल्याचे दिसून आले आहे.

निवडून येण्याऐवजी  पाडण्यासाठी उभे राहतात अपक्ष
अनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते खाण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले जातात. एखाद्या परिसरातील एकगठ्ठा मते आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू शकतील असे वाटल्यास त्या भागातील गणेश मंडळाचा अध्यक्ष किंवा एखाद्या कार्यकर्त्याला मुद्दामहून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास सांगितले जाते. त्यातून प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते खाण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या भागातील मते आपल्याला मिळणारच नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर अशा प्रकारचे डावपेच लढविले जातात. त्यामुळे अपक्ष उमेदवार हे बऱ्याचदा निवडून येण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी उभे केले जातात.

अपक्ष म्हणून निवडून येऊ असा विश्वास
राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये व्यवस्थित लक्ष देत नाहीत. नगरसेवकांकडे प्रश्न घेऊन गेल्यावर ते सांगतात, ‘‘आम्ही पैसे देऊन निवडून आलो आहोत, आता आम्ही तुमची कामे करणार नाही.’’ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. मी गेल्या ५ वर्षांत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. - भरत सुराणा, अपक्ष उमेदवार, महर्षीनगर

Web Title: Due to the hope of independents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.