उमेदवार वाढल्याने प्रशासनही धास्तावले
By admin | Published: October 4, 2014 11:35 PM2014-10-04T23:35:38+5:302014-10-04T23:35:38+5:30
सभा, मेळावे घेण्यासाठी लागणा:या परवानगीसाठी ‘एक खिडकी’वर अर्जाचा भडीमार सुरू झाला असून जवळपास तिपटीने काम वाढले आह़े
Next
>पुणो : उमेदवारांची वाढलेली संख्या, त्यात मिळालेला कमी कालावधी त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी मिरवणुका, पदयात्र, कोपरा सभा, मेळावे घेण्यासाठी लागणा:या परवानगीसाठी ‘एक खिडकी’वर अर्जाचा भडीमार सुरू झाला असून जवळपास तिपटीने काम वाढले आह़े प्रचाराच्या चित्रीकरणासाठी जवळपास 1क्क् व्हिडिओ कॅमेरे लागणार असल्याचा जिल्हा निवडणूक शाखेचा अंदाज आह़े पूर्वी एका मतदारसंघात 5 कॅमेरे लागत होत़े आता प्रचाराच्या शेवटच्या दिवसात त्यांची संख्या 15 र्पयत जाण्याची शक्यता आह़े
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व प्रकारच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात आली़ या खिडकीत संपूर्ण जिल्ह्यातून सर्व प्रकारच्या परवानगीसाठी दररोज सरासरी 5क् अर्ज येत होत़े आता सर्व विधानसभा मतदारसंघात एक खिडकी योजना सुरू केली असून प्रचाराला प्रारंभ झाला असतानाच दररोज सरासरी 3क् अर्ज येत आहेत. प्रचार जसजसा पुढे सरकत जाईल, त्यानुसार ही संख्या वाढत जाण्याची शक्यता आह़े या सर्व परवानग्या 48 तासांच्या आत देता याव्यात, यासाठी तेथील कर्मचारी रात्री उशिरार्पयत थांबून
सुटी न घेता सलग काम करीत आहेत़ (प्रतिनिधी)
कॅमे:यांची मागणी वाढली
च्प्रचारफेरी, पदयात्र, कोपरा सभा, प्रचार साहित्यवाटप याबरोबर निवडणूक आयोगाने नेमलेल्या तपासणी पथकाबरोबर चित्रीकरणासाठी कॅमेरे पुरविण्यात येणार आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये वाढ झाल्याने आता प्रत्येक मतदारसंघाची प्रचारात वाढ झाली आह़े
च्उमेदवारांनी परवानगी मागितलेल्या प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरामन पुरविला जातो़ सध्या प्रामुख्याने पदयात्र, मेळावे आणि कोपरा सभा होत आहेत़ राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा, मेळावे सुरू झाले, की आणखी व्हिडिओ कॅमेरे लागण्याची शक्यता आह़े
च्प्रशासनाने त्यासाठी टेंडर काढले होत़े आता त्यात वाढ करावी लागणार आह़े प्रचार शिगेला पोहोचेल, त्या वेळी प्रत्येक मतदारसंघात 1क् ते 15 व्हिडिओ कॅमेरे लागण्याची शक्यता आह़े