थंडी वाढल्याने पिंपरीत वाढले अपघात

By admin | Published: December 22, 2014 05:23 AM2014-12-22T05:23:01+5:302014-12-22T05:23:01+5:30

शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी

Due to the increase of cold, the accidents caused by pumping in the pumps | थंडी वाढल्याने पिंपरीत वाढले अपघात

थंडी वाढल्याने पिंपरीत वाढले अपघात

Next

पिंपरी : शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच रस्ते अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी प्रवासाला जाताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या दहा दिवसांत पहाटे आणि सकाळच्या वेळेतच अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी तर एकाच दिवसात अपघाताच्या चार घटना घडल्या. पैकी तीन अपघात सकाळी साडेसहा ते आठच्या सुमारास घडले. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक हैराण आहेत. अपघाताची कारणे वेगवेगळी असली, तरी बहुतेक अपघात वाढत्या थंडीमुळेही घडत आहेत. अनेकजण कामानिमित्त सकाळी लवकरच घराबाहेर पडतात. व्यावसायिकांसह नोकरदार सकाळीच घरातून निघतात. मात्र, वाहनाने जाताना हवी तितकी काळजी घेतली जात नाही. यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत.
वाढत्या थंडीमुळे वातावरणात दाट धुके निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनाच्या समोरच्या काचेवर दव जमा होतात. प्रवासादरम्यान समोरचे स्पष्ट दिसत नाही. रस्ताही लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठी वाहनाचा वेग कमी असावा, वायपर सुस्थितीत असावेत, तसेच लाईट सुरू ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून समोरील वाहनास अंदाज येऊ शकतो. वेग कमी असताना वाहनाचे चाक खड्ड्यात गेल्यास अथवा रस्त्यावरून खाली उतरून अपघात झाल्यास जीवितास धोका निर्माण होत नाही.
थंडीत दुचाकीवर प्रवासाला जाताना हेल्मेटसह स्वेटर, हातमोजे, बूट घालणे आवश्यक आहे. हेल्मेटविना दुचाकी चालविल्यास थंड हवा नाका-तोंडात गेल्याने डोके दुखून दुचाकीवरील नियंत्रण सुटू शकते. हातमोजे वापरणेही गरजेचे आहे. ही साधी गोष्ट अपघातास निमंत्रण देणारी ठरू शकते.
दुचाकीचे नियंत्रण बहुतांश हँडलवरच असते. त्यासाठी बोटांचा उपयोग होतो. क्लच, बे्रक दाबणे या प्रक्रियांवर परिणाम होऊन दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडू शकतो. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the increase of cold, the accidents caused by pumping in the pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.