वाढत्या रुग्णसंख्येमुळे जेजुरीत पुन्हा कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:19+5:302021-04-01T04:11:19+5:30
मागील वर्षी ३० सप्टेंबर २०२० रोजी देवसंस्थानच्या वतीने व आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ...
मागील वर्षी ३० सप्टेंबर २०२० रोजी देवसंस्थानच्या वतीने व आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. १० फेब्रुवारीपर्यंत ते सुरू होते. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे व शाळा सुरू झाल्यामुळे कोविड सेंटर बंद करण्यात आले होते .पहिल्या टप्प्यात येथील कोविड सेंटरमध्ये अंदाजे १७०० रुग्णांनी उपचार घेतले होते.
सध्याच्या काळात पुरंदरमध्ये रुग्णांचे संख्येत लक्षणीय वाढ होत असून, त्यांचेवर उपचारासाठी दिवे येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. मात्र नीरा व पूर्व पुरंदरमधील रुग्णांना, नजीक उपचार, आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच घरातील इतर सदस्यांपासून विलगीकरण व्हावे या हेतूने आमदार संजय जगताप, तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या सूचनेवरून पुन्हा कडेपठार पायथ्यानजीक कोविड सेंटर सुरू करण्यात आले.
मंगळवारी (दि. ३०) तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या हस्ते खंडोबा प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कोविड सेंटरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या वेळी आरोग्य विभागाचे डॉ. विवेक आबनावे, डॉ. महेश मसराम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने ,नगराध्यक्षा वीणा सोनवणे, जेजुरीच्या मुख्याधिकारी पूनम शिंदे- कदम, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे ,विश्वस्त राजकुमार लोढा ,शिवराज झगडे ,संदीप जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे आदी उपस्थित होते.
कोविड सेंटरसाठी आमदार संजय जगताप यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे, तर देवसंस्थानच्या वतीने रुग्णांना मोफत ,चहा ,नास्ता ,जेवण ,व इतर सुविधा मोफत देण्यात येणार आहेत ,असे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी सांगितले.
मार्तंड देवसंस्थान संचलित जेजुरी येथील कोविड सेंटरचे उद्घाटन करताना पुरंदर तहसीलदार रुपाली सरनोबत व मान्यवर.