अस्वच्छतेच्या गर्तेत भाविक
By admin | Published: June 20, 2017 07:11 AM2017-06-20T07:11:45+5:302017-06-20T07:11:45+5:30
आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते.
दिंडीचा मुक्काम कोठे, भोजनाची व्यवस्था, पालखी मुक्कामावरील कार्यक्रम कोणते, या सर्वांचे नियोजन केलेले असते व याची प्रत्येकी एक प्रत दिंडीतील प्रत्येक व्यक्तीकडे असते; पण या सर्व नियोजनात सर्वांत महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टींचे नियोजन दिसत नाही. वारकऱ्यांशी बोलताना त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये महिला वारकऱ्यांना अनेक समस्या आहेत. शौचास कुठे जायचे, उरलेले अन्न कोठे टाकायचे, अस्वच्छ शौचालय, राहण्याची सोय आदी प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रशासनाने दिलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. पालिकेने शौचालयाच्या सुविधा दिल्या आहे, फिरती शौचालये देखील आहेत. पण, मुळातच वारकरी संख्या इतकी जास्त आहे की, ही व्यवस्था कमी पडते.